Khelo India Youth games Saam tv news
Sports

Sports News: खेलो इंडिया योजनेअंतर्गत पुण्यात आयोजित स्पर्धेत रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांना प्रत्येकी दोन सुवर्ण पदके

Khelo India Youth Games: अस्मिता महिला ऍथलेटिक्स लीग शहर आणि विभाग स्तरावरील स्पर्धेत पुण्याच्या रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके जिंकली.

Ankush Dhavre

Khelo India Youth Games:

खेलो इंडिया योजनेअंतर्गत पुण्यातील बाबुराव सणस मैदानावर काल आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अस्मिता महिला ऍथलेटिक्स लीग शहर आणि विभाग स्तरावरील स्पर्धेत पुण्याच्या रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके जिंकली.

रुजुला भोसले हिने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तर साक्षी बोऱ्हाडे हिने ८०० आणि १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली .

भारतीय क्रीडा प्राधिकरण मुंबई केंद्राने महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यातून मिळून एकंदर ८५ ऍथलेट सहभागी झाले होते . १०० मीटर , २०० मीटर , ४०० मीटर , ८०० मीटर आणि १५०० ते ५ हजार मीटर धावण्याबरोबरच लांब उडी , तिहेरी उडी , गोळा फेक , थाळी फेक , भालाफेक अशा विविध १४ प्रकारच्या क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता . अन्य क्रीडा प्रकारातील ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रिषिका शेट्टी हिने तर ५ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत विजयालक्ष्मी कटारे हिने सुवर्ण पदक पटकावले .

लांब उडी क्रीडा प्रकारात शिल्पा जवाराजन , गोळाफेक मध्ये अमृता कटके , थाळीफेक स्पर्धेत अमीरा शाह आणि भालाफेक स्पर्धेत ईश्वरी धंगेकर यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली . भर पावसात झालेल्या या स्पर्धेला पुणेकर क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .

त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या शकुंतला खटावकर , गुरुबन्स कौर , रेश्मा पाटील आणि राखी गौड यांच्यासह अनेक महिला खेळाडू देखील यावेळी आवर्जून उपस्थित होत्या . महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड , सरचिटणीस सतीश उच्छिल , पुण्याच्या माजी महापौर दीप्ती चवधरी , आणि कुस्ती प्रशिक्षक बबिता सणस , वरुण त्यागी यांनी देखील यावेळी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. (Latest sports updates)

देशभरातील महिला खेळाडूंना त्यांची ओळख निर्माण करण्याबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी आणि क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे हा या स्पर्धेमागचा मुख्य हेतू असल्याचे सतीश उच्छील यांनी सांगितले.

खेलो इंडिया योजनेअंतर्गत यापूर्वी सलग दोन वर्षे आयोजित करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या स्पर्धांमधून देशभरातील सुमारे २५ हजार महिला खेळाडू सहभागी झाले होते .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT