Ind vs Aus 1st ODI Result: शमीने रोखलं, गिल - ऋतुराजने ठोकलं! ऑस्ट्रेलियाला लोळवत टीम इंडिया बनली नंबर 1

India vs Australia 1st ODI Highlights: शमीने रोखलं, गिल - ऋतुराजने ठोकलं! ऑस्ट्रेलियाला लोळवत टीम इंडिया बनली नंबर 1
Ind vs Aus 1st ODI Result
Ind vs Aus 1st ODI ResultSaam Tv
Published On

India vs Australia 1st ODI Highlights:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना मोहालीच्या मैदानावर रंगला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला विजयासाठी २७७ धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा यशस्वी पाठलाग करत भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने पाकिस्तानला मागे सोडत आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे.

आधी फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत सर्व गडी गमावून केवळ २७६ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ४८.४ षटकांत ५ बाद २८१ धावा करून सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने २, पॅट कमिन्स आणि शॉन अॅबॉटने १-१ विकेट घेतली.

Ind vs Aus 1st ODI Result
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार, काय आहे कारण?

२७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी झाली. ऋतुराज गायकवाड ७७ चेंडूत ७१ धावा करून बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेला श्रेयस अय्यर तीन धाव करत तंबूत परतला. यानंतर शुभमन गिल ७४ धावांवर बाद झाला.  (Latest Marathi News)

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सर्व गडी गमावून २७६ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने ५ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ५२ धावा केल्या. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात मिचेल मार्शला (४) बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. रवींद्र जडेजाने डेव्हिड वॉर्नरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वॉर्नरने ५३ चेंडूत ५२ धावा केल्या. (Latest sports updates)

Ind vs Aus 1st ODI Result
U19 world Cup चे वेळापत्रक जाहीर; कोणासोबत असणार भारताचा पहिला सामना? किती संघ दाखवतील दमखम, जाणून घ्या

स्टीव्ह स्मिथ ६० चेंडूत ४१ धावा करून बाद झाला. मार्नस लॅबुशेन फक्त ३९ धावा करू शकला. अश्विनने त्याला बाद केले. यानंतर कॅमेरून ग्रीन ३१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्कस स्टॉइनिसने २१ चेंडूत २९ धावा केल्या. जोश इंग्लिसने ४५ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. मॅथ्यू शॉर्टला केवळ २ धावा करता आल्या. पॅट कमिन्सने ९ चेंडूत २१ धावांचे योगदान दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com