U19 world Cup चे वेळापत्रक जाहीर; कोणासोबत असणार भारताचा पहिला सामना? किती संघ दाखवतील दमखम, जाणून घ्या

U19 world cup 2024 : ICCअंडर १९ पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२४ च्या वेळापत्रकाची घोषणा झालीय.
U19 world cup 2024 schedule
U19 world cup 2024 scheduleicc Twitter
Published On

U19 world cup 2024 schedule : ICCअंडर १९ पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२४ च्या वेळापत्रकाची घोषणा झालीय. भारतीय संघ अंडर-१९ विश्वचषकाचा गतविजेता आहे. टीम इंडियाने गेल्या अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव केला होता. यंदा अंडर-१९चा पुरुष क्रिकेट विश्वचषक १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान श्रीलंकेत होणार आहे. या स्पर्धेत १६ संघ दमखम दाखवतील. (latest News)

श्रीलंका तिसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. दरम्यान २००६ नंतर श्रीलंका पहिल्यांदाच स्पर्धेचे आयोजन करत आहे. या स्पर्धेत गतविजेता भारतीय संघ या विश्वचषकातील पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना १४ जानेवारीला कोलंबोमध्ये होणार आहे. ही स्पर्धा कोलंबोशिवाय ५ ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ४ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर.के. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण ४१ सामने खेळवले जाणार आहेत.

या विश्वचषकात १६ संघांना चार गटांमध्ये विभागले जाईल, प्रत्येक गटात चार संघ असतील, परंतु प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ आता सुपर सिक्स फेरी जातील. 13 ते 21 जानेवारी दरम्यान साखळी फेरीचे सामने होतील. भारतीय संघाचा समावेश अ गटात असून भारता व्यतिरिक्त बांगलादेश, अमेरिका व आयर्लंड हे देखील याच गटात आहेत.

श्रीलंकेतील पाच मैदानांवर हा विश्वचषक खेळला जाईल. यजमान श्रीलंका १३ जानेवारी रोजी झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्याने स्पर्धेचे उद्घाटन करणार आहे. तर गतविजेता भारत दुसऱ्या दिवशी बांगलादेशविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल.

U19 World Cup schedule
U19 World Cup scheduleicc Twitter

या विश्वचषकात १६ संघांना ४ गटांमध्ये विभागले जाणार आहे. प्रत्येक गटात ४ संघ असतील, परंतु प्रत्येक गटातील अव्वल ३ संघ आता सुपर सिक्स फेरीत जातील. १३ ते २१ जानेवारी दरम्यान साखळी फेरीचे सामने होतील. भारतीय संघाचा समावेश अ गटात असून भारता व्यतिरिक्त बांगलादेश, अमेरिका व आयर्लंड हे देखील याच गटात आहेत. श्रीलंकेतील पाच मैदानांवर हा विश्वचषक खेळला जाणार आहे.

U19 World Cup schedule
U19 World Cup scheduleICC Twitter

भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक

१४ जानेवारी २०२४ - भारत विरुद्ध बांगलादेश

१८ जानेवारी २०२४ - भारत विरुद्ध यूएसए

२० जानेवारी २०२४ - भारत विरुद्ध आयर्लंड

संघाचे ४ गट

अ गट

भारत, बांगलादेश , आयर्लंड ,अमेरिका (यूएसए )

ब गट

इंग्लंड, दक्षिण आफ्रिका,वेस्ट इंडिज ,स्कॉटलंड

क गट

ऑस्ट्रेलिया, श्रीलंका ,झिम्बाब्वे,नामिबिया

ड गट

अफगाणिस्तान,पाकिस्तान,न्यूझीलंड,नेपाळ

U19 world cup 2024 schedule
Varanasi Cricket Stadium: डमरूसारखं पव्हेलियन, त्रिशूळासारख्या लाईट्स; देवांच्या काशीत 'असं' भव्यदिव्य क्रिकेट स्टेडियम होणार, पाहा झलक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com