RR vs RCB IPL 2024 Rajasthan royals vs royal challengers bengaluru live updates virat kohli amd2000 twiter
Sports

RR vs RCB, IPL 2024: विराटचा राजस्थानवर हल्लाबोल! विजयासाठी ठेवलं 184 धावांचं आव्हान

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru: आयपीएल २०२४ स्पर्धेतील १९ व्या सामन्याचा थरार राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघांमध्ये सुरु आहे

Ankush Dhavre

RR vs RCB Live Updates:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १९ व्या सामन्याचा थरार राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २० षटकअखेर ३ गडी बाद १८३ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स संघाला विजयासाठी १८४ धावांची गरज आहे.

या सामन्यात संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीची जोडी मैदानावर आली होती. दोघांनी मिळून संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी १२५ धावांची भागीदारी केली.

फाफ डू प्लेसिस ४४ धावा करत माघारी परतला. तर विराटने राजस्थानवर हल्लाबोल सुरुच ठेवला. विराट या डावात एकाकी झुंज देताना दिसून आला. त्याला नॉन स्ट्राईकला आलेल्या फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. विराटने ७२ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ११३ धावांची खेळी केली. (Cricket news in marathi)

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangluru): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक) सौरव चौहान, रिस टोप्ली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urfi Javed: डोळ्याखाली जखम, चेहऱ्यावर रक्त; उर्फी जावेदची अशी का झाली अवस्था ? चाहते चिंतेत

७५ वर्षीय वृद्धेचे अब्रुचे लचके तोडले, झोपडपट्टीत घुसून तरूणाकडून जबरदस्ती, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Driving School: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम शाळा कशी निवडावी? अर्ज करण्याचे स्टेप-बाय-स्टेप टिप्स

Mumbai Rain : मानखुर्दमध्ये पावसाचे तांडव, रस्त्यांवर नदी, कमरेइतके पाणी, नागरिकांची कसरत

SCROLL FOR NEXT