राजस्थान रॉयल्स संघाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात विराट कोहलीने चौफेर फटकेबाजी करत आपलं शतक पूर्ण केलं आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ६७ चेंडूंचा सामना करत त्याने आपलं शतक पू्र्ण केलं. हे त्याच्या आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील ८ वे शतक ठरले आहे.
आपल्या होम ग्राऊंडवर राजस्थान रॉयल्स संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर टॉस गमावलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीची जोडी मैदानावर आली होती. (Cricket news in marathi)
दोघांनी मिळून संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी १२५ धावांची भागीदारी केली. फाफ डू प्लेसिस ४४ धावा करत माघारी परतला. तर विराटने राजस्थानवर हल्लाबोल सुरुच ठेवला. विराट या डावात एकाकी झुंज देताना दिसून आला. त्याला नॉन स्ट्राईकला आलेल्या फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही.
विराट कोहलीचं हे आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील ८ वे शतक ठरले आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपतेय. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड विराटच्या नावावर आहे.
मात्र त्याला संघाकडून हवी तशी साथ मिळालेली नाही. या स्पर्धेतील ५ सामन्यांमध्ये त्याने ३०० हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील इतर फलंदाज संघर्ष करत होते. त्यावेळी विराट एकटा उभा राहिला आणि आपलं शतक पूर्ण केलं. यापूर्वीही त्याने नाबाद ८३ धावांची खेळी केली होती. त्यावेळी त्याला आपलं शतक पूर्ण करता आलं नव्हतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.