Riyan Parag  x (twitter)
Sports

Riyan Parag RR Vs CSK : रियान परागला 'ती' चूक नडली! सामना जिंकूनही BCCI ची मोठी कारवाई

RR Vs CSK IPL 2025 : गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये स्लो ओव्हर रेटमुळे राजस्थानचा कर्णधार रियान परागवर कारवाई करण्यात आली आहे.

Yash Shirke

IPL 2025 : गुवाहाटीमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात राजस्थानचा सहा धावांनी विजय झाला. चेन्नईला पराभूत करुन राजस्थानच्या संघाने आयपीएल २०२५ मधला पहिला विजय मिळवला. पण राजस्थानचा कर्णधार रियान परागला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे रियानला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

राजस्थान रॉयल्सने निर्धारित वेळेत २० ओव्हर्स पूर्ण न केल्याने कर्णधार रियान परागला दंड भरावा लागणार आहे. "३० मार्च २०२५ रोजी गुवाहाटी येथील स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यामध्ये स्लो ओव्हर-रेटमुळे कर्णधार रियान परागला दंड ठोठावण्यात येत आहे. IPL च्या कंडक कोडच्या कलम २.२२ अंतर्गत स्लो ओव्हर-रेटच्या नियमाचे पालन न केल्याने परागला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे", असे आयपीएलने अधिकृत प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे. रियान परागची या सीझनमधील पहिली चूक असल्याचेही यात नमूद केले होते.

आयपीएल २०२५ सुरु होण्यापूर्वी बीबीसीआयने स्लो ओव्हर-रेट कायद्याच्या अंतर्गत कर्णधारांना मॅच बॅनमधूून सूट देण्याचा निर्णय दिला होता. २१ मार्च रोजी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये सर्व टीम्सच्या कर्णधारांनी या निर्णयाला संमती दर्शवली होती. स्लो ओव्हर-रेटसाठी मॅच बॅनच्या जागी डिमेरिट पॉइंट्सची शिक्षा दिली जाईल किंवा दंड आकारला जाईल असा निर्णय झाल्याची माहिती क्रिकबझने दिली होती.

हार्दिक पंड्यानंतर रियान पराग हा स्लो ओव्हर रेटसाठी दंड आकारण्यात आलेला दुसरा कर्णधार आहे. मुंबई विरुद्ध गुजरात या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे पंड्याला देखील १२ लाख रुपयांचा दंड बसला होता. याशिवाय आयपीएल २०२४ च्या सामन्यामध्ये स्लो ओव्हर रेटमुळे यंदाच्या सीझनमध्ये हार्दिकवर पहिल्या मुंबईच्या सामन्यात बंदी घालण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT