IPL 2024 latest points table standings after RCB vs SRH Match  twitter
क्रीडा

IPL 2025: RCBचं ठरलं! हे ५ खेळाडू रिटेन अन् या गोलंदाजाला uncapped Player म्हणून घेणार

Royal Challengers Bengaluru Retain Players: आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ कोणत्या कोणत्या खेळाडूंना रिटेन करू शकतो? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IPL 2025 , RCB Retain Players List: आयपीएल २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. येत्या काही दिवसांत मेगा ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनपूर्वी सर्व संघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आगामी हंगामासाठी ६ खेळाडूंना आपल्या संघात स्थान देऊ शकतो. कोणते आहेत ते ६ खेळाडू? जाणून घ्या.

विराटला रिटेन करणार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ विराट कोहलीला कधीच रिलीज करणार नाही. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ विराट कोहलीला पहिल्या क्रमांकावर रिटेन करू शकतो. कोहली हा पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतोय. त्याच्याकडे या संघाचं नेतृत्व करण्याचा देखील चांगलाच अनुभव आहे

अन्कॅप्ड खेळाडू म्हणून या खेळाडूला रिटेन करणार

विराटनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ फाफ डू प्लेसिसला रिटेन करू शकतो. गेल्या हंगामात तो या संघाचा कर्णधार होता. यासह गेल्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार गोलंदाज यश दयालला अन्कॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन केले जाऊ शकते.

गेल्या हंगामात रजत पाटीदारने शानदार फलंदाजी केली होती. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने संधीचं सोनं केलं आणि संघासाठी धावा केल्या. त्यामुळं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आपला हुकमी एक्का राखून ठेवू शकतो.

यासह अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल देखील पुन्हा याच संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो. यासह भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज देखील पुन्हा एकदा याच संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो. त्यामुळे विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, मोहम्मद सिराज आणि रजत पाटीदार हे रिटेन केलेले खेळाडू असू शकतात. तर यश दयालला अन्कॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन केले जाऊ शकतो

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT