PBKS vs RCB Final match  Saam tv
Sports

IPL 2025 : ठरलं! पंजाब फायनलमध्ये विराटच्या सेनेशी भिडणार; आयपीएलच्या चषकावर कोण नाव कोरणार?

PBKS vs RCB Final match : पंजाब आता फायनलमध्ये विराटच्या सेनेशी भिडणार आहे. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष आता फायनलकडे लागलं आहे.

Vishal Gangurde

इंडियन प्रीमियर लीगमध्ये विराट कोहलीच्या बंगळुरू संघानंतर पंजाबच्या संघाने फायनलमध्ये जबरदस्त एन्ट्री मारली आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या अंतिम सामन्यात पंजाबचा संघ हा आरसीबीशी भिडणार आहे. पहिल्यांदा एकही चषक न जिंकलेले दोन्ही संघ येत्या ३ जून रोजी आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे यंदाचा आयपीएलचा अंतिम सामना कोण जिंकणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला ५ विकेटने पराभूत केलं. मुंबईला धूळ चारून पंजाब किंग्स फायनलमध्ये पोहोचला आहे. आता फायनलमध्ये पंजाबचा सामना थेट रॉयल चॅलेंज बँगळुरुसोबत होणार आहे. त्यामुळे येत्या ३ जून रोजी होणाऱ्या सामन्याकडे साऱ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.

पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने चांगली फंलदाजी केली. मुंबई इंडियन्सने २० षटकात २०२३ धावा कुटल्या. मुंबई इंडियन्सने दिलेल्या आव्हानाचा पंजाब किंग्सने यशस्वी पाठलाग केला. पंजाब किंग्सने एक षटक राखून सामना खिशात टाकला.

आरसीबी चौथ्यांदा आयपीएलच्या फालनलमध्ये

आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायमध्ये आरसीबीने पंजाब किंग्सला धूळ चारली. पंजाब किंग्सला पराभूत करून विराट कोहलीच्या सेनेने फायनलचं तिकीट कन्फर्म केलं. आरसीबीने तब्बल ९ वर्षांनी फायलनमधील एन्ट्री निश्चित केली. आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने पंजाबला ८ विकेटने पराभूत केलं.

या सामन्यात विराट कोहली १२ धावांवर बाद झाला होता. विराटचा विकेट गेल्यानंतर फिल साल्टने मयंक अग्रवालच्या साथीने डाव सावरला. दोघांनी मिळून ५४ धावांची भागीदारी रचली. पुढे मयंक अग्रवाल १९ धावांवर बाद झाला. तर फिल साल्टने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आरसीबी चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे. याआधी आरसीबी २००९, २०११, २०१६ साली आयपीएलच्या फायनलमध्ये धडकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT