rohit sharma saam tv
Sports

Rohit Sharma Marathi:'वर्ल्डकप जिंकलोय नाचायला पाहिजे ना..',जेव्हा रोहित शर्मा मराठीत बोलतो, पाहा VIDEO

Rohit Sharma Answer In Marathi: भारतीय संघाच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने मराठीत संवाद साधला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारतीय संघाच्या स्वागतासाठी जणू संपूर्ण मुंबई मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल झाली होती. जिकडे नजर जाईल तिकडे भारताचा तिरंगा, फॅन्सची गर्दी आणि मुंबईचा राजा, रोहित शर्माच्या घोषणा. मुंबई कधीच थांबत नाही. असं म्हणतात, पण भारतीय संघाने कित्येक तास मुंबई थांबवून ठेवली. वर्ल्डकप विजयाचा जल्लोष हा मुंबईत पार पडला. या जल्लोषात लाखो मुंबईकरांनी हजेरी लावली होती. दरम्यान या सोहळ्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नरिमन पॉईंटहून जेव्हा भारतीय संघाला घेऊन जाणारी बस निघाली, त्यावेळी चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. दुपारी भर उन्हात ते संध्याकाळी भर पावसात मुंबईकर थांबून राहिले आणि भारतीय खेळाडूंचं जल्लोषात स्वागत केलं. दरम्यान रोहितने फॅन्सचेही आभार मानले आणि ही ट्रॉफी देशाची आहे, असं म्हटलं.

रोहित शर्माने साम टीव्हीशी बोलताना मराठीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, ' खूप आनंद झाला, आम्ही वर्ल्डकप जिंकलो आहे. २००७ आणि २०२४ मध्ये तसा काही फरक नाही. कारण वर्ल्डकप हा वर्ल्डकप असतो. निवृत्तीची घोषणा केली आहे. कारण कुठेतरी थांबायलाच हवं ना. वर्ल्डकप जिंकलो आहे त्याच्यामुळे मी नाचलो आज.'

रोहितला भेटण्यासाठी क्रिकेट फॅन्ससह त्याच्या आई वडिलांनीही हजेरी लावली होती. हा जल्लोष पाहून त्यांचेही डोळे पाणावले. दरम्यान बऱ्याच दिवसांनी रोहितला पाहिल्यानंतर त्यांनाही आपल्या भावना अनावर झाल्या. रोहित समोर येताच त्यांनी रोहितला मिठी मारली.

भारतीय संघ १ जुलै रोजी भारतात दाखल होणार होता. मात्र चक्रीवादळामुळे भारतीय खेळाडू भारतात येऊ शकले नव्हते. त्यानंतर ३ जुलैला एअर इंडियाचं विमान खेळाडूंना घेऊन भारतात येण्यासाठी निघालं आणि ४ जुलैला भारतात दाखल झालं. भारतात आल्यानंतर खेळाडूंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत भारतीय संघाची विजयी परेड काढण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

SCROLL FOR NEXT