rohit sharma yandex
Sports

Rohit Sharma Retirement: आता रोहितने निवृत्त व्हावं...गेल्या १४ डावातील रेकॉर्ड पाहून नेटकरी संतापले

Rohit Sharma Viral Meme: भारताचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या १४ डावात पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. दरम्यान नेटकरी संतप्त प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.

Ankush Dhavre

भारताचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीत सातत्याने फ्लॉप ठरतोय. या मालिकेत त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटीतही तो स्वस्तात माघारी परतला आहे.

ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचे फलंदाच धावांचा पाऊस पाडत होते, त्याच खेळपट्टीवर रोहित शर्मा फ्लॉप ठरला आहे. दरम्यान पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतल्यानंतर, नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

गेल्या १४ कसोटी डावात कसा राहिलाय रेकॉर्ड?

रोहित गेल्या १४ कसोटी डावात पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. यादरम्यान त्याला केवळ एकदाच ५० धावांचा आकडा गाठता आला आहे. या १४ डावातील १० डावात त्याला दुहेरी आकडा देखील गाठता आलेला नाही. या १४ डावात त्याला १५५ धावा करता आल्या आहेत. फलंदाज म्हणून तर तो फ्लॉप ठरतोय, मात्र आता त्याच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

रोहित शर्माच्या फ्लॉप शो नंतर, नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने रोहितचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये रोहित शर्म आणि जसप्रीत बुमराहची आकडेवारी शेअर केली आहे. बुमराहने या मालिकेत २५ गडी बाद केले आहेत. तर रोहितने अवघ्या २२ धावा केल्या आहेत. तर आणखी एका युजरने रोहितला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे.

ऑस्ट्रेलियाने केल्या ४७४ धावा

या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. प्रथम फलंदाजी करताना, ऑस्ट्रेलियाला ४७४ धावा करता आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक १४० धावांची खेळी केली.

सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या सॅम कॉन्टासने ६० धावांची खेळी केली. तर उस्मान ख्वाजाने ५७ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मार्नस लाबुशेनने ७२ धावा केल्या. शेवटी कर्णधार पॅट कमिन्सने ४९ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ४७४ धावांवर पोहोचवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Sudden death in sleep: झोपेत अचानक मृत्यू होण्यामागची कारणं कोणती? धोका टाळण्यासाठी शरीरातील 'हे' बदल नक्की ओळखा

Kumbha Rashi: कुंभ राशीच्या व्यक्तींचा दिवस कसा असेल? प्रेमात खटके, पण समाजात मिळेल नवी ओळख; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT