rohit sharma washington sundar twitter
Sports

Rohit Sharma Viral Video: लाइव्ह सामन्यात रोहित, वॉशिंग्टन सुंदरला मारायला धावला? नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Rohit Sharma Washington Sundar Viral Video: भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसरा वनडे सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यातही श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यातील पहिल्या डावात असं काहीतरी करताना दिसून आला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारताचा वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यासह मैदानावर क्षेत्ररक्षण करताना, तो आपल्या वन लाईनर डायलॉगसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी त्याची अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यात तो आपल्या सहकारी खेळाडूंना काहीतरी सांगताना दिसतो. मात्र यावेळी तो थेट मारायला धावला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

हिटमॅनचा मजेशीर अंदाज

तर झाले असे की, भारतीय संघाकडून १५ वे षटक टाकण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीला आला होता. त्यावेळी पहिला चेंडू टाकण्यापूर्वी त्याने रनअप घेतला. मात्र त्याचा पाय सरकला. त्यामुळे तो पुन्हा एकदा रनअप घेण्यासाठी धावला. यावेळीही ही त्याचा पाय सरकला. हे पाहून स्लीपमध्ये असलेला रोहित हसला आणि त्याला मारण्यासाठी धावला. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

मोठ्या रेकॉर्डमध्ये राहुल द्रविडला सोडलं मागे

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत राहुल द्रविडला मागे सोडलं आहे. या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी रोहित शर्मा, राहुल द्रविडच्या रेकॉर्डपासून २ धावा दूर होता. दरम्यान २ धावा करताच त्याने राहुल द्रविडला मागे सोडलं. राहुल द्रविडच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये १०७६८ धावा केल्या होत्या. दरम्यान रोहित शर्मा हा भारतीय संघासाठी वनडेत सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT