Rohit Sharma Record: पहिल्याच वनडेत रोहितला इतिहास रचण्याची संधी! राहुल द्रविडलाही सोडू शकतो मागे

IND vs SL, ODI Series: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचण्याची संधी असणार आहे.
Rohit Sharma Record: पहिल्याच वनडेत रोहितला इतिहास रचण्याची संधी! राहुल द्रविडलाही सोडू शकतो मागे
rohit sharmasaam tv
Published On

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील शेवटच्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. यासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने टी-२० मालिका ३-० खिशात घातली. येत्या २ ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात रोहितला वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

Rohit Sharma Record: पहिल्याच वनडेत रोहितला इतिहास रचण्याची संधी! राहुल द्रविडलाही सोडू शकतो मागे
IND vs SL 3rd T20: टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये जिंकला शेवटचा T20 सामना, भारताकडून श्रीलंकेला क्लीन स्वीप

वनडेत षटकार किंग बनण्याची संधी

रोहित शर्माला क्रिकेटमध्ये हिटमॅन असे म्हटले जाते. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात ३ षटकार मारताच त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे. तो वनडेत सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार बनू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड हा इंग्लंडचा माजी कर्णधार ओएन मॉर्गनच्या नावावर आहे. रोहितने आतापर्यंत एकूण २३१ षटकार मारले आहेत. तर ओएन मॉर्गनच्या नावे २३३ षटकार मारण्याची नोंद आहे. अवघे ३ षटकार मारताच रोहित मॉर्गनला मागे सोडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार बनू शकतो.

Rohit Sharma Record: पहिल्याच वनडेत रोहितला इतिहास रचण्याची संधी! राहुल द्रविडलाही सोडू शकतो मागे
IND vs SL,3rd T20I: आज बॉलिंग तेरा भाई करेगा! 6 धावांची गरज असताना सूर्याने असा फिरवला सामना -VIDEO

सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड करण्यासह रोहितला आणखी एक मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. रोहितने आतापर्यंत २६२ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १०७०९ धावा केल्या आहेत. ज्यात ३१ शतकं आणि ५५ अर्धशतकांचा समावेश आहे. भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविडच्या नावे वनडेत १०७६८ धावा करण्याची नोंद आहे.

राहुल द्रविडचा हा रेकॉर्ड मोडण्यासाठी रोहितला अवघ्या ६० धावांची गरज आहे. यासह रोहित भारतीय संघासाठी वनडेत सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरेल. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. तर विराट कोहली दुसऱ्या स्थानी आणि सौरव गांगुली तिसऱ्या स्थानी आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दिसणार अॅक्शनमध्ये

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होता. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला जेतेपदाला गवसणी घातली. ही स्पर्धा झाल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. तो आता वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळताना दिसेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com