Rohit Sharma MI : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यामध्ये रोहित शर्मा १७ धावांवर बाद झाला आहे. संघाला सगळ्यात जास्त गरज असताना रोहित शर्मा फेल झाला आहे. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या हिटमॅनने पुन्हा एकदा चाहत्यांना नाराज केले आहे. आयपीएल २०२५ मध्ये रोहितचा खराब फॉर्म सुरु आहे. यामुळे त्याला दोन सामन्यांमध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवण्यात आले होते. आज पुन्हा लवकर बाद झाल्याने रोहितला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
दुसऱ्या ओव्हरमध्ये जेव्हा यश दयाल गोलंदाजीसाठी आला. त्याच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर रोहित क्लीनबोल्ड झाला. रोहितने आजच्या महत्त्वपूर्ण सामन्यात ९ बॉल्समध्ये १७ धावा केल्या आहेत. या खराब खेळीमुळे हिटमॅनवर टीका होत आहे. खराब फॉर्ममुळे रोहित शर्माला लखनऊ विरुद्धच्या सामन्यात प्लेईंग ११ मधून वगळण्यात आल्याचे काहीजण म्हणत होते. आजच्या सामन्यात रोहितची विकेट पडल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स पाहायला मिळत आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये रोहित शर्माचा खूप वाईट फॉर्म सुरु आहे. पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. दुसऱ्या सामन्यात त्याने ८ धावा केल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये १३ धावांवर रोहितची विकेट पडली. चौथ्या सामन्यात दुखापतग्रस्त असल्याने रोहितला संघातून वगळण्यात आले होते. आजच्या सामन्यामध्ये रोहितने फक्त १७ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 -
विल जॅक्स, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुथूर
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूची प्लेईंग 11 -
फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.