Jio चे दमदार रिचार्ज प्लान्स! एका रिचार्जमध्ये 10 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन एकदम FREE, तुम्ही पाहिलेत का?

Jio Recharge Plans : रिलायन्स जिओचे दोन दमदार रिचार्ज प्लान ज्यांच्यामुळे तुम्ही एक किंवा दोन नव्हे तर १० ओटीटी सेवांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवू शकतात. जाणून घ्या या रिचार्ज प्लान्सबद्दल...
Jio Recharge Plans OTT Subscription
Jio Recharge Plans OTT Subscriptionx
Published On
Summary
  • Jio रिचार्जमध्ये आता 10 OTT अ‍ॅप्स फ्री मिळतील.

  • जिओच्या दोन रिचार्ज प्लॅन्समध्ये फ्री OTT अ‍ॅक्सेस आहे.

  • एका रिचार्जमध्ये कॉलिंग, डेटा आणि मनोरंजन मिळवा.

Recharge Plans : आता तुम्हाला वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी स्वतंत्र सबस्क्रिप्शन खरेदी करण्याची गरज नाही. फक्त एका रिचार्जमध्ये विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या काही प्रीपेड प्लॅन्समध्ये असे काही रिचार्जचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यांमुळे तुम्हाला १० वेगवेगळ्या ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. आता आम्ही तुम्हाला या खास प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत.

पहिला प्लान - १७५ रुपयांचा रिचार्ज

एकाधिक ओटीटी सेवा देणारा हा जिओ कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान आहे. याच्या अंतर्गत अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळते. हा फक्त डेटा पॅक आहे. २८ दिवसांचा कालावधी असलेल्या या रिचार्जमध्ये १० जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. पण या रिचार्ज प्लॉनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएसचे फायदे मिळत नाही.

या प्लॅनसोबत यूजर्संना SonyLIV, Zee5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kanccha Lannka, Planet Marathi, Chaupal, आणि Hoichoi अशा ओटीटी प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस मिळतो. सर्व कंटेंट तुम्ही जिओ टीव्ही मोबाईल अ‍ॅपवर पाहू शकता.

Jio Recharge Plans OTT Subscription
मध्यमवर्गीयांना हक्काचं घर मिळणार, मोदी सरकारची सर्वसामान्यांना दिवाळीची भेट

दुसरा प्लान - ४४५ रुपयांचा रिचार्ज

जर तुम्हाला दररोज डेटा वापरायचा आहे आणि अनलिमिटेड 5G इंटरनेट हवे आहे, तर हा प्लान तुमच्यासाठीच आहे. या प्लान अंतर्गत दोन जीबी डेली डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस अशी सुविधा उपलब्ध आहे. हा प्लान देखील २८ दिवसांसाठीचा आहे. यूजर्संना या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळतो.

या प्लॅनसोबत SonyLIV, Zee5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kanccha Lannka, Planet Marathi, Chaupal, आणि Hoichoi यांसारख्या १० OTT प्लॅटफॉर्म्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. याशिवाय, या रिचार्जवर कंपनीकडून काही खास ऑफर्स देखील दिल्या जातात.

Jio Recharge Plans OTT Subscription
Cabinet Reshuffle : नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी; भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीसह २५ जणांचा समावेश, संपूर्ण यादी वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com