मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी मध्यरात्री सोलापुरातील नेत्यांची खलबतं झाली आणि रचली गेली.. सोलापुरात येऊ घातलेल्या राजकीय भूकंपाची पटकथा...आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपूर्वी जयकुमार गोरेंच्या माध्यमातून सोलापूरातील 4 माजी आमदारांनी भाजप पक्षप्रवेशाची तयारी सुरु केलीय.. फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीनंतर या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालयं..
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, सोलापूर दक्षिणमधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे..
दरम्यान कार्यकर्त्याच्या रेट्यामुळे य़ेऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भूमिका घेणं गरजेचं असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंनी केलयं..
केवळ माजी आमदाराच नव्हे तर माजी उपमहापौर आणि माजी नगसेवकांनीही भाजपात पक्षप्रवेश केलाय...(GFX लावणे.. NEW) दुसरीकडे मोदी आणि फडणवीसांच्या कामाकडे पाहून माजी आमदार भाजपात येतायत, असं विधान भाजप नेत्यांनी केलयं...तर राष्ट्रवादीतही लवकरच मेगा इन्कमिंग होणार आहे.. ज्यामुळे अनेकांच्या कानठळ्या बसतील, अशी म्हणत अमोल मिटकरींनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावलाय..
सोलापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे... मोहिते पाटलांसारखे दिग्गज नेते आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलयं.. ज्याच्या हाती सहकारी संस्था त्याच्याकडे सत्तेची चावी हे सोलापुराचं राजकीय गणित राहिलयं... त्यामुळे मोहोळ आणि माढ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे आव्हान उभं करण्यासाठी आणि अजित पवारांना शह देण्यासाठी भाजप ही रणनिती आखत आहे...
भाजपमधली ही माजी आमदारांची इनकमिंग जशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे आव्हानं उभं करू शकते... तसचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असू शकतो.. यामधून भाजप एकाच दगड दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करतोय.. त्यामुळे भाजपची ही रणनिती भविष्यात किती यशस्वी ठरणार? यामुळे महायुतीत वादाला तोंड फुटणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.