वेस्ट इंडिजविरुद्धची टेस्ट सिरीज संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान तीन वनडे आणि पाच टी-२० सामन्यांची सिरीज खेळली जाणार आहे. या सिरीजपूर्वी टीम इंडियाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
अजीत आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआय (BCCI) निवड समिती आज म्हणजेच ४ ऑक्टोबर शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
निवड समितीच्या बैठकीत रोहित शर्माच्या वनडे कर्णधारपदावर मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. रोहितने शेवटचा वनडे सामना ९ मार्च २०२५ रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. हा सामना ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चा अंतिम सामना होता. ज्यामध्ये टीम इंडियाने कीवी टीमवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली. त्यामुळे कर्णधारपदाचा मुद्दा ही बैठकीतील चर्चेचा एक महत्त्वाचा विषय ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची टीममध्ये निवड होण्याची शक्यता आहे. मात्र रोहितचं वनडे टीमचं कर्णधारपद कायम ठेवतील की नाही यावर अजूनही माहिती मिळालेली नाही. रोहित आणि विराट यांनी टी-२० आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे हे दोन्ही वरिष्ठ खेळाडू सध्या वनडेमध्येच खेळतात. दोघांनी शेवटचा वनडे सामना ९ मार्च २०२५ रोजीच खेळला होता.
IPL २०२५ नंतर रोहित आणि विराट यांनी कोणतीही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेलं नाही. Cricbuzzच्या अहवालानुसार, रोहितला वनडे कर्णधारपद कायम ठेवायचं की नाही, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अजीत आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती या विषयावर रोहितसोबत चर्चा करणार आहे.
रोहितने २०२७ क्रिकेट वर्ल्डकप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या तो माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतोय. नायरने नुकतेच सोशल मीडियाद्वारे रोहितने तब्बल १० किलो वजन कमी केलं असल्याची माहितीही दिली.
रोहित शर्मा डिसेंबर २०२२ पासून भारतीय वनडे टीमचा नियमित कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०२३ च्या वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरी गाठली. जरी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. पण त्याआधी भारतीय टीमने सलग १० सामने जिंकले होते. याशिवाय याच वर्षाच्या सुरुवातीला रोहितने भारताला ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चं विजेतेपद मिळवून दिलं. ज्यामध्ये टीम इंडिया अपराजित राहिली. तसेच भारताने २०२४ चा टी-२० वर्ल्डकप एकही सामना न गमावता जिंकला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.