Ind vs WI Highlights : धावांचा पाऊस! ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजाची शतके; टीम इंडिया भक्कम स्थितीत, वेस्ट इंडीजवर पराभवाचे ढग

India vs West Indies 1 test match 2nd Day : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात अहमदाबादमध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. केएल राहुलनंतर अनुभवी रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल यांच्या शतकांच्या जोरावर टीम इंडिया भक्कम स्थितीत पोहोचली आहे.
अहमदाबाद कसोटीत भारताचा वरचष्मा, वेस्ट इंडीज पराभवाच्या छायेत
India vs WI Dhruv Jurel and Ravindra Jadeja/bcci/xsaam tv
Published On
Summary
  • अहमदाबाद कसोटीत भारतीयांचा वरचष्मा

  • दुसऱ्या दिवशी ध्रुव जुरेल, रविंद्र जडेजाची शतकी खेळी

  • टीम इंडियाकडे २८६ धावांची आघाडी

  • वेस्ट इंडीजचा संघ पराभवाच्या छायेत

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचं पारडं जड दिसून येत आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला असून, भारतानं पहिल्या डावात ५ विकेटच्या बदल्यात ४४८ धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळं वेस्ट इंडीजचा संघ बॅकफूटला गेला असून, भारताच्या विजयाची शक्यता जवळपास ९८ टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत-वेस्ट इंडीज कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा म्हणजे ३ ऑक्टोबरचा खेळ संपला आहे. भारतानं ५ विकेट गमावून ४४८ धावा केल्या आहेत. रविंद्र जडेजा १०४ आणि वॉशिंग्टन सुंदर हा ९ धावांवर खेळत आहे. २८६ धावांची आघाडी भारताकडं आहे. सध्या भारतीय संघ भक्कम स्थितीत आहे. जडेजा, ध्रुव जुरेल आणि केएल राहुल या तिघांनी शतक झळकावले आहेत. वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६४ धावांवर गुंडाळला आहे.

आतापर्यंत कशी झाली भारतीय फलंदाजी?

यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलनं भारताच्या डावाची सुरुवात चांगली केली. पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. यशस्वी ३६ धावा करून बाद झाला. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या साई सुदर्शनला फक्त ७ धावा करता आल्या. त्यानंतर राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी डाव सावरला. राहुलने पहिल्या दिवशी अर्धशतक पूर्ण केलं होतं.

दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात गिल आणि राहुल यांनी सुरेख फलंदाजी केली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी झाली. शुभमन यानं ५ चौकारांच्या मदतीने १०० चेंडूंत ५० धावा केल्या. रोस्टन चेज यानं गिलला बाद केलं. पण राहुलनं दुसरीकडं आपलं शतक पूर्ण केलं. त्यानं १०० धावा केल्या. त्यात १२ चौकारांचा समावेश आहे. राहुलचं हे ११ वं शतक आहे. तर मायदेशातील दुसरं शतक आहे.

अहमदाबाद कसोटीत भारताचा वरचष्मा, वेस्ट इंडीज पराभवाच्या छायेत
कुलदीप यादवचा मॅजिक बॉल, फलंदाजाच्या दांड्या गुल; बाद कधी झाला कुणालाच कळलं नाही, VIDEO

राहुल बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल यांनी पाचव्या विकेटसाठी २०६ धावांची भागीदारी केली. जुरेल यानं कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. त्यानं १५ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं १२५ धावा केल्या. जडेजानंही शतक साजरं केलं. ६ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर त्यानं १०४ धावा केल्या. त्याचं कसोटी कारकिर्दीतील हे सहावं शतक आहे.

अहमदाबाद कसोटीत भारताचा वरचष्मा, वेस्ट इंडीज पराभवाच्या छायेत
IND vs WI Day-1 Highlights: आधी सिराज अन् बुमराहनं कंबरडं मोडलं, नंतर राहुलनं कुटलं; वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या दिवशी भारताचं पारडं जड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com