Rohit Sharma x
Sports

Rohit Sharma : तीन मॅचमध्ये फ्लॉप, रोहित शर्मा आज संघाबाहेर; कारण...

Rohit Sharma MI : एकाना स्टेडियममध्ये लखनऊ विरुद्ध मुंबई हा आयपीएल २०२५ मधला सामना सुरु झाला आहे. या सामन्यात मुंबईच्या प्लेईंग ११ मधून रोहित शर्माला वगळण्यात आले आहे. यामागील कारण हार्दिक पंड्याने स्पष्ट केले आहे.

Yash Shirke

LSG VS MI : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना एकाना स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्यामध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यामध्ये रोहित शर्माला वगळण्यात आले आहे. मुंबईच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

टॉस झाल्यानंतर हार्दिक पंड्याने प्लेईंग ११ ची घोषणा केली. आजच्या मुंबईच्या अकरा खेळाडूंमध्ये रोहित शर्मा नसल्याचे हार्दिकने सांगितले. सराव करत असताना रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती पंड्याने दिली. या दुखापतीमुळे आजच्या सामन्याला हिटमॅन मुकणार असल्याचे हार्दिक पंड्याने स्पष्ट केले.

आयपीएल २०२५ मध्ये मुंबईच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई विरुद्ध खेळताना शून्य धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात गुजरातच्या विरोधात मैदानामध्ये उतरल्यावर रोहित ८ धावांवर बाद झाला. तर केकेआरविरुद्धच्या सामन्यामध्ये तो १३ धावा करुन माघारी परतला. सध्या हिटमॅन रोहित शर्माचा खराब फॉर्म सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

विल जॅक्स, रेयान रिकल्टन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ड, अश्वनी कुमार, दीपक चहर, विग्नेश पुथुर.

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेईंग ११ -

एडन माक्ररम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकुर, दिग्वेश राठी, आकाश दीप, आवेश खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Varsha Usgaonkar: वर्षा उसगांवकरांचा जन्मभूमीवर खास बहुमान; गोवा राज्य चित्रपट महोत्सवात 'या' पुरस्काराने सन्मानित

Screen time effects on kids: वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय चिडचिडेपणाची समस्या; कसं कराल स्क्रीन टाईम मॅनेजमेंट?

Maharaja Palace History: शाही घराण्याचा गौरव, सांस्कृतिक वारसा असलेल्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक पॅलेसची माहिती

अरबी समुद्रात वाऱ्याने दिशा बदलली, मुंबईत पावसाचं रौद्ररूप, IMD कडून रेड अलर्ट, शाळाही बंद

SCROLL FOR NEXT