Sourav Ganguly on Rohit Sharma saam tv
Sports

Rohit Sharma: रोहित शर्माची मानसिक स्थिती...; भारतीय कर्णधाराच्या खराब फॉर्मबाबत काय म्हणाला सौरव गांगुली?

Sourav Ganguly on Rohit Sharma: मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या डावात देखील रोहित शर्मा फेल झाला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या या खराब फॉर्मवर आता टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने रोहितबाबत मोठं विधान केलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जात असून मेलबर्नमध्ये या सिरीजमधील चौथा सामना खेळवण्यात येतोय. आज या सामन्याच्या पाचवा दिवस असून चाहत्यांना रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहित शर्मा पुन्हा एकदा फेल गेला. या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये रोहित शर्मा ओपनिंगला उतरला होता. मात्र तरीही त्याला फॉर्म गवसला नाही. कर्णधार रोहित शर्माच्या या खराब फॉर्मवर आता टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने रोहितबाबत मोठं विधान केलं आहे.

रोहित शर्मावर टीका

या सामन्यातील पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारताला ३४० रन्सचं आव्हान दिलं होतं. या सामन्यातील भारताच्या दुसर्‍या डावात रोहित चांगली कामगिरी करेल अशी सर्व चाहत्यांची आशा होती. मात्र तसं घडलं नाही. रोहित अवघ्या ९ रन्सवर बाद झाला. यानंतर रोहित शर्मावर पुन्हा एकदा टीका होऊ लागल्या आहेत.

काय म्हणाला सौरव गांगुली?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या खराब फॉर्मची बरीच चर्चा आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने रोहितच्या टेस्ट कारकिर्दीवर मोठं विधान केलं असून, स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे फक्त तीन डाव शिल्लक आहेत, असं म्हटलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टेस्ट सिरीजदरम्यान गांगुलीने हे वक्तव्य केलं आहे. टीम इंडियाचा दुसरा डाव सुरु होण्यापूर्वी गांगुली यांनी हे वक्तव्य केलं होतं

एक न्यूज चॅनेलशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, रोहित मानसिकदृष्ट्या कोणत्या स्थितीत आहे याची मला कल्पना नाही. पहिल्या डावात त्याने खराब शॉट खेळला. आता त्याच्याकडे मेलबर्नमध्ये दुसऱ्या डावात आणि सिडनीमध्ये दोन डाव आहेत. त्याला या डावांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. अन्यथा त्याची टेस्ट कारकीर्द धोक्यात येऊ शकते.

गावस्कर यांनीही दिला इशारा

केवळ सौरव गांगुलीच नाही तर टीम इंडियाचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही रोहितच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केलंय. एका मीडिया मुलाखतीत गावस्कर म्हणाले की, "रोहितच्या पुढील तीन डाव त्याच्या टेस्ट कारकिर्दीचे भवितव्य ठरवतील." गावस्कर यांनीही आपल्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त करत रोहितने आपल्या कामगिरीत लवकर सुधारणा न केल्यास त्याला टेस्ट टीममध्ये राहणं कठीण होऊ शकतं, असं म्हटलं होतं.

कर्णधारपद आणि फलंदाजीचं प्रेशर

रोहित शर्माला केवळ फलंदाजीसाठीच नाही तर कर्णधारपदावरही टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्याची रणनीती आणि टीमची निवड अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात आहे. रोहित शर्माने 2024 मध्ये 14 टेस्ट सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे. यापैकी भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली 7 टेस्ट सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावलेत. रोहित शर्माने 2024 मध्ये 14 टेस्ट सामन्यांमध्ये 24.76 च्या सरासरीने 619 धावा केल्या आहेत ज्यात 2 शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT