
मेलबर्नमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्याचा आज चौथा दिवस आहे. पहिल्या डावात टीम इंडिया ३६९ रन्सवर ऑलआऊट झाली. सामन्याच्या चौथ्या दिवशी नितीश कुमार रेड्डी ११४ रन्स करून आऊट झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 105 रन्सची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची टीम फलंदाजीसाठी आली तेव्हा जसप्रीत बुमराहने त्यांना सुरुवातीलाच मोठा झटका दिला.
बुमराहने पुन्हा नव्या चेंडूने चांगली कामगिरी केली. बुमराहने या सामन्यात डेब्यू करणारा ऑस्ट्रेलियाचा ओपनर सॅम कॉन्स्टासला क्लीन बोल्ड केलं. यानंतर मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. बुमराहने कॉन्स्टासची विकेट घेताच स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. यानंतर बुमराहने जे सेलिब्रेशन केलं ते भारतीय चाहत्यांना देखील अपेक्षित नव्हतं.
कॉन्स्टासने पहिल्या डावात आक्रमक कामगिरी करत भारतीय गोलंदाजी वर्चस्व गाजवलं होतं. त्यावेळी त्याने बुमराहविरूद्ध चांगला खेळ केला होता. मात्र दुसऱ्या डावात मात्र बुमराहने सॅमविरूद्ध बाजी मारली. उस्मान ख्वाजासोबत ओपनिंगला आलेल्या कॉन्स्टसने बुमराह त्याचा नवा जोडीदार आकाश दीप यांच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना केला. परंतु तो केवळ 18 चेंडूपर्यंत क्रीझवर राहू शकला.
बुमराहने 7व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत त्याला आऊट केले. बुमराहचा बॉल कॉन्स्टासच्या बॅट आणि पॅडमधून गेला आणि ऑफ-स्टंपच्या वरच्या बाजूला लागला. यामुळे त्यालाही आश्चर्य वाटलं. यावेळी बुमराहने अगदी उत्तम पद्धतीने विकेट साजरी केली.
विकेट घेताच बुमराहने आपले दोन्ही हात वर केले आणि प्रेक्षकांना दाखवत त्यांना सेलिब्रेट करण्यास सांगितलं. यावेळी बुमराहने तिसऱ्या दिवशी थेट कॉन्स्टासने केलेल्या कृतीकडे लक्ष वेधलं. जेव्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजाने बाऊंड्री लाईनवर फिल्डींग करत होता त्यावेळी विराटची विकेट गेल्यानंतर त्याने असं सेलीब्रेशन केलं होतं. दरम्यान बुमराहच्या या सेलिब्रेशनने माजी कर्णधार सुनील गावस्करही प्रभावित झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.