rohit sharma in wimbledon twitter
क्रीडा

Rohit Sharma: अनंत-राधिकाचं लग्न सोडून रोहित शर्मा लंडनवारीला! हिटमॅनची विम्ब्लडनमध्ये थाटात एन्ट्री- VIDEO

Rohit Sharma In Wimbledon: भारतीय संंघाचा वर्ल्डकपविजेता कर्णधार रोहित शर्माने विम्ब्लडन पाहण्यासाठी हजेरी लावली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाला आयसीसी टी -२० वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा सध्या लंडनमध्ये आहे. १२ जुलै रोजी विम्बल्डन पाहण्यासाठी हजेरी लावली. एकीकडे लंडनमध्ये विम्बल्डन स्पर्धेचा थरार सुरू आहे. तर मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मात्र मुंबईच्या राजाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा सोडून लंडनला जाण्याला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले आहे. रोहितचा हटके लुकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

लंडनमध्ये हटके स्वागत

अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आणि ट्रॉफी उंचावली. दरम्यान वर्ल्डकप विजेत्या रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. विम्बल्डनमध्येही त्याने शानदार एन्ट्री केली. हा व्हिडिओ विम्बल्डनच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान या व्हिडिओवर कॅप्शन म्हणून, ' वेलकम टु विम्बल्डन रोहित शर्मा', असं लिहिण्यात आलं आहे.

रोहित शर्माच्या लुकची सर्वत्र चर्चा होत आहे. सूट बूट आणि काळ्या रंगाचा चष्मा घालून त्याने विम्बल्डनच्या कोर्टवर शानदार एन्ट्री केली. सोशल मीडियावर त्याच्या या हटके स्टाईलची जोरदार चर्चा सुरू आहे.

रोहित शर्मासह अनेक दिग्गज मंडळींनी विम्बल्डन पाहण्यासाठी हजेरी लावली होती. स्पर्धेतील सेमिफायनलचा सामना पाहण्यासाठी दिनेश कार्तिकसह त्याची पत्नी दीपिका पल्लेकलने देखील हजेरी लावली. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी अनंत अंबानीच्या लग्नाला जाणं पसंत केलं. मात्र रोहित आणि दिनेश कार्तिकने विम्बल्डन पाहण्यास पसंती दिली आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने देखील ही स्पर्धा पाहण्याासाठी हजेरी लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT