rohit sharma twitter
क्रीडा

Rohit Sharma Statement: 'तोंड बंद ठेवा...',खेळपट्टीच्या मुद्द्यावरुन रोहित भडकला; म्हणाला...

Rohit Sharma On Ind vs Sa 2nd Test: केपटाऊनच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

Ankush Dhavre

Rohit Sharma On Pitch Controversy:

केपटाऊनच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

या पराभवाचा वचपा काढत रोहितसेनेने केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव केला. दरम्यान हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात छोटा सामना ठरला आहे. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने खेळपट्टीवरून आयसीसीच्या रेफ्रीवर निशाणा साधला आहे.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर १०६.२ षटकात ७ गडी राखून विजय मिळवला . विजयानंतर रोहित म्हणाला की, आम्हाला अशा प्रकारच्या खेळपट्टीवर खेळण्यात काहीच अडचण नाही. मात्र भारतात जेव्हा पहिल्याच दिवशी चेंडू फिरायला लागतो तेव्हा तक्रार करू नका.

या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ' या कसोटीत काय झालं हे सर्वांनी पाहिलं, या खेळपट्टीवर काय होत होतं हे देखील सर्वांनीच पाहिलं. खरं सांगू तर मला अशाप्रकारच्या खेळपट्टीवर खेळण्यात काहीच अडचण नाही. मात्र तोपर्यंतच जोपर्यंत सर्व जण भारतात येऊन आपलं तोंड बंद ठेवतील.' (Latest sports updates)

रोहित पुढे म्हणाला की,' वर्ल्डकप फायनलचा सामना ज्या मैदानावर खेळला गेला, त्या खेळपट्टीला सरासरी रेटिंग दिली गेली. मी मॅच रेफ्रीला विनंती करतो की, खेळपट्टी पाहुन रेटिंग द्यावी. तो सामना कुठल्या देशात आहे यावरुन ठरवू नये. भारतात पहिल्याच दिवशी खेळपट्टीवरुन धूळ उडते म्हणता, इथेही खेळपट्टीवर भेगा पडल्या होत्या.'

या कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ख्रिस ब्रॉड आयसीसीचे मॅच रेफ्री होते. रोहितच्या मते, जागतिक पॅनेलमध्ये समाविष्ट असलेला रेफ्री 'तटस्थ' असावा. रेफ्री खेळपट्टीचं मुल्यांकन कसं करतात यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सोलापूर दक्षिण मधून पोस्टल मतमोजणीत सुभाष देशमुख आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT