भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना इतिहासाला गवसणी घातली आहे. बांगलादेशविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
आपल्या आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना ११ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. तो वनडे क्रिकेटमध्ये दुसरा सर्वात जलद ११ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे सोडलं आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २२९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रोहित आणि गिलने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. यादरम्यान ११ धावा करताच रोहितने वनडे क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा पल्ला गाठला.
यासह वनडे क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा पल्ला गाठणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. तर सौरव गांगुलीने देखील ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
रोहित शर्माने हा कारनामा २६१ व्या डावात करुन दाखवला आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हा कारनामा २७६ व्या डावात केला होता. तर अव्वल स्थानी असलेल्या विराट कोहलीने हा कारनामा २२२ डावात केला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने हा कारनामा २८६ डावात केला होता. तर सौरव गांगुली यांनी हा कारनामा २८८ डावात केला होता.
सर्वात कमी डावात ११ हजार धावा पूर्ण करणारे खेळाडू
२२२ - विराट कोहली
२६१ - रोहित शर्मा
२७६ - सचिन तेंदुलकर
२८६- रिकी पोंटिंग
२८८ - सौरव गांगुली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.