
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने यजमान पाकिस्तानच्या टीमचा धुव्वा उडवला. तर आज भारताचा बांगलादेशाविरूद्ध सामना रंगणार आहे. टीम इंडिया सामने खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये आलेला नाही. भारत आपले सर्व सामने दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहेत. दरम्यान आज पहिल्याच सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माची तब्येत बरी नाहीये. त्यामुळे टीम इंडियाच्या ताफ्यात चिंतेत वातावरण आहे. काही रिपोर्ट्नुसार, रोहित शर्मा आजच्या सामन्यात खेळवणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी बुधवारी कर्णधार रोहित शर्माने भारतीय टीमच्या वतीने पत्रकार परिषदेत येऊन अनेक प्रश्नांची उत्तर दिली. मात्र, यावेळी रोहित थोडा अस्वस्थ दिसत होता. यावेळी त्याची प्रकृती ठीक नव्हती. पत्रकार परिषदेदरम्यान रोहितला अनेकदा खोकला आला. असं असूनही, भारतीय कर्णधाराने पत्रकाराने प्रश्नांचा सामना केला.
या पत्रकार परिषदेदरम्यान समिती सदस्याकडून त्याने पाण्याची ऑफर नाकारली. यावेळी रोहितने आपण ठीक असल्याचं सांगितलं. मात्र आता रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताच्या पहिल्या सामन्यात खेळणार की नाही याची चाहत्यांना चिंता आहे.
यंदाची ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जात असून भारताला आपले सर्व सामने दुबईतच खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत अटीतटीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. याबाबत रोहितला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, "मला वाटतं की खेळपट्टीचं शक्य तितक्या लवकर मूल्यांकन करणं आवश्यक आहे. यापूर्वी आम्ही दुबईमध्ये बरेच क्रिकेट खेळलोय. आम्हाला शक्य तितक्या लवकर जुळवून घ्यावं लागेल आणि परिस्थितीनुसार गोष्टी कराव्या लागतील."
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर भारताला 23 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि त्यानंतर 2 मार्चला न्यूझीलंडशी सामना करायचा आहे. अशा स्थितीत गटातील सर्व सामने महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया पहिल्या सामन्यात कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.