rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma PC: दुसऱ्या कसोटीआधी रोहितचा धाडसी निर्णय! 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडणार

Rohit Sharma On Kl Rahul: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर पार पडला होता.

रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २९५ धावांनी रेकॉर्डब्रेकिंग विजय मिळवला होता. मालिकेतील दुसरा सामना हा डे-नाईट कसोटी सामना असणार आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या कसोटीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे फलंदाजीक्रमात बदल पाहायला मिळाला होता. यशस्वी जयस्वालसोबत केएल राहुल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आला होता.

या सामन्यातील पहिल्या डावात दोघांनाही चांगली सुरुवात करता आली नव्हती. मात्र त्यानंतर दुसऱ्या डावात दोघांनी मिळून २०१ धावांची भागीदारी केली होती.

त्यामुळे रोहितने कमबॅक केल्यानंतर, सलामी जोडी बदलणार की राहुल सलामीला येणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आता रोहितने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

सलामीला कोण येणार?

सामन्याच्या एक दिवसापूर्वी झालेल्या मुलाखतीत बोलताना केएल राहुलच सलामीला येणार असल्याचा खुलासा केला आहे. तर रोहित स्वत: मधल्या फळीत खेळताना दिसून येणार आहे.

केएल राहुलचं कौतुक करताना रोहित शर्मा म्हणाला, 'केएलने काय कमाल फलंदाजी केली..मी माझ्या लहान मुलासह त्याची फलंदाजी पाहत होतो. त्याने दमदार खेळ केला, त्यामुळे आता बदल करता येणार नाही.भविष्यात कदाचित बदल होऊ शकतो. परदेशात येऊन अशी फलंदाजी करणं, तो त्याचा हक्क आहे, त्याला मिळायला हवा.'

त्यामुळे आता केएल राहुल यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरुवात करणार, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तर रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. रोहित शर्मा २०१९ पासून कसोटीत सलामीला फलंदाजी करण्यासाठी येतोय.

यापूर्वी देखील त्याला मधल्या फळीत फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. आता ६ वर्षांनंतर तो पहिल्यांदाच कसोटीत मधल्या फळीत फलंदाजीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT