भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघाचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना नासाऊ काऊंटी क्रिकेटच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघाने सराव सामन्यात बांगलादेशचा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्नविश्वास वाढलेला असणार आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला ३ मोठे रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत टी-२० आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३९७४ धावा केल्या आहेत. त्याला टी-२० क्रिकेटमध्ये ४००० धावा करण्याची संधी असणार आहे. हा रेकॉर्ड करण्यासाठी त्याला अवघ्या २६ धावा करायच्या आहेत. टी-२० आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ४०३७ धावा केल्या आहेत. तर ४०२३ धावा करणारा बाबर आझम दुसऱ्या स्थानी आहे.
रोहित शर्मा हा हिटमॅन म्हणून ओळखला जातो. आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात १० षटकार खेचताच त्याला २०० षटकार पूर्ण करण्याची संधी असणार आहे. रोहितने आतापर्यंत १९० षटकार खेचले आहेत. सर्वाधिक षटकार मारण्याची नोंद ही रोहितच्याच नावे आहे.
रोहित शर्मासाठी ही स्पर्धा अतिशय खास असणार आहे. कारण २००७ पासून ते आतापर्यंत झालेल्या सर्व टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहितला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत ९६३ धावा केल्या आहेत. जर त्याने या सामन्यात २७ धावा केल्या. तर तो १००० धावा करणारा तिसरा फलंदाज ठरु शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.