T20 WC IND vs IRE, Weather: भारत- आयर्लंड सामना पावसामुळे रद्द होणार? वाचा कसं असेल हवामान

ICC T20 World Cup | India vs Ireland Match, Weather News In Marathi: भारतीय संघ आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान कसं असेल हवामान जाणून घ्या.
IND vs IRE, Weather Update: भारत- आयर्लंड सामना पावसामुळे रद्द होणार? वाचा कसं असेल हवामान
India vs Ireland Match PlayersGoogle

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. भारतीय संघ आजपासून आपल्या टी -२० वर्ल्डकप अभियान सुरू करणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना रात्री ८ वाजता नासाऊच्या काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघ आयर्लंडला धूळ चारून विजयी सलामी देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र पाऊस या सामन्यात खोडा घालू शकतो. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? जाणून घ्या.

अॅक्युवेदरने दिलेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी होणाऱ्या सामन्यात ऊन पडेल. यासह ढगाळ वातावरण असण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार, सकाळी १०:३० वाजता सुरु होणार आहे. तर भारतात हा सामना रात्री ८ वाजता सुरु होईल. क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज अशी की,या सामन्यासाठी पाऊस पडण्याचा कुठलाच अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो. सामन्यावेळी तापमानाचा पार २१ डिग्री ते २६ डिग्री इतका असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

IND vs IRE, Weather Update: भारत- आयर्लंड सामना पावसामुळे रद्द होणार? वाचा कसं असेल हवामान
IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ७ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर १ सामना हा अनिर्णीत राहिला आहे. या ८ पैकी ७ सामने हे डबलिनमध्ये खेळले गेले आहेत. १ सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने हा सामना पूर्ण होऊ शकला नव्हता. हे दोन्ही संघ हा सामना जिंकून विजयाने सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

IND vs IRE, Weather Update: भारत- आयर्लंड सामना पावसामुळे रद्द होणार? वाचा कसं असेल हवामान
IND vs IRE: जयस्वालला विश्रांती तर रोहित- संजू ओपनिंगला! सलामीच्या लढतीत अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ (Indian Team For ICC T20 World Cup 2024):

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

या स्पर्धेसाठी असा आहे आयर्लंडचा संघ (Ireland Team For ICC T20 World Cup 2024):

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्रयु बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, ग्राहम ह्यूम, जोश लिटिल, बॅरी मॅकार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लोरकन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com