IND vs IRE: जयस्वालला विश्रांती तर रोहित- संजू ओपनिंगला! सलामीच्या लढतीत अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

India vs Ireland, Team India Playing XI Prediction: भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
IND vs IRE: जयस्वालला विश्रांती तर रोहित- संजू ओपनिंगला! सलामीच्या लढतीत अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११
rohit sharmatwitter/bcci

भारतीय संघ आजपासून मिशन टी -२० वर्ल्डकपला सुरुवात करणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा सामना आयर्लंडसोबत होणार आहे. आयर्लंडचा संघ कुठल्याही क्षणी मुसंडी मारु शकतो. त्यामुळे भारतीय संघाला सावध राहावं लागणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता, नासाऊच्या काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात रोहित शर्मा कुठल्या ११ खेळाडूंना संधी देऊ शकतो? जाणून घ्या.

भारतीय संघ सराव सामन्यात बांगलादेशविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यावेळी सलामीला आलेले रोहित शर्मा आणि संजू सॅमसन पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. मात्र त्यानंतर रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी मिळून डाव सांभाळला आणि संघाची धावसंख्या १८० पार नेली. या सामन्यात रोहित शर्मा संजू सॅमसनसोबत सलामीला उतरला होता. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, या सामन्यातही रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल सलामीला येऊ शकतो.

यष्टिरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंत खेळणार हे जवळजवळ निश्चित आहे. कारण गेल्या सामन्यात रिषभ पंतने अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे संजू सॅमसन आणि रिषभ पंत दोघांनाही प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

IND vs IRE: जयस्वालला विश्रांती तर रोहित- संजू ओपनिंगला! सलामीच्या लढतीत अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११
IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी मिळणं जवळजवळ निश्चित आहे. तो जसप्रीत बुमराहसोबत गोलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तर मोहम्मद सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते. शिवम दुबे संघात असताना हार्दिक पंड्या मुख्य वेगवान गोलंदाज म्हणून खेळताना दिसून येऊ शकतो. तर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांना संघात स्थान दिले जाऊ शकते.

IND vs IRE: जयस्वालला विश्रांती तर रोहित- संजू ओपनिंगला! सलामीच्या लढतीत अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११
IND vs PAK: भारत- पाक सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आलं मोठं कारण

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११-

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com