rohit sharma  yandex
क्रीडा

IND vs BAN: रोहितने मोडला सचिनचा महारेकॉर्ड! धोनीलाही सोडलं मागे

Ankush Dhavre

भारताचा बांगलादेशविरुद्ध मिळवलेला विजय हा ऐतिहासिक ठरला आहे. चेन्नईच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर २८० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे देखील एक मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

रोहितने काही दिवसांपूर्वीच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो सध्या वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे. रोहित भारतीय संघात असताना भारतीय संघाने ३०८ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

रोहितने आतापर्यंत एकूण ४८३ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १९२३४ धावा केल्या आहेत. तर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना ३०७ सामने जिंकले आहेत. या यादीत विराट अव्वल स्थानी आहे. विराट संघात असताना भारताने ३२२ सामने जिंकले आहेत. तर एकूण रेकॉर्ड पाहिला,तर रिकी पाँटींग ३७७ विजयांसह या यादीत अव्वल स्थानी आहे.

चेन्नई कसोटीत विराट-रोहित फ्लॉप

या सामन्यात भारतीय संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या सामन्यातील पहिल्या डावात रोहित अवघ्या ६ धावा करत माघारी परतला होता. यादरम्यान त्याला १ चौकार मारता आला. तर दुसऱ्या डावात त्याला ५ धावा करता आल्या. रोहितसह विराटही फ्लॉप ठरला. विराट पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात १७ धावा करत माघारी परतला.

भारताने हा सामना २८० धावांनी आपल्या नावावर केला. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना येत्या २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ बांगलादेशचा सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : 15 दिवसांत आचारसंहिता लागेल, कार्यकर्त्यांनो कामाला लागा; अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, VIDEO

Maharashtra News Live Updates : आरटीओ कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार

Satara : इंद्रधनुष्याची चादर अन् डोंगर रांगा, साताऱ्यातील गाव पाहून होईल स्वर्गाची अनुभूती

Tirupati Laddu Controversy: 'नायडू हे खोटे बोलणारे, राजकारणासाठी श्रद्धेशी खेळतायत', लाडूच्या वादावर जगन यांचं पंतप्रधानांना पत्र

Beetroot Juice: सकाळी बिटरुट ज्यूस पिण्याचे जबरद्स्त फायदे...

SCROLL FOR NEXT