Rohit Sharma: तो खूप कठीण काळातून गेला...; चेन्नई टेस्ट जिंकल्यानंतर रोहितने कोणाला दिलं विजयाचं श्रेय?

Rohit Sharma on Win First Test vs BAN: भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 280 रन्सने विजय मिळवला. या विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला ते पाहूयात.
Rohit Sharma on Win First Test vs BAN
Rohit Sharma on Win First Test vs BANsaam tv
Published On

चेन्नईमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशाचा दारूण पराभव केला. टीम इंडियाने बांगलादेशला पहिली टेस्ट जिंकण्यासाठी ५१५ रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करणं बांगलादेशाच्या टीमसाठी कठीण गेलं. अखेरीस पाहुणी टीम २३४ रन्सवर ऑलआऊट झाली. भारताने हा सामना 280 रन्सने जिंकला आणि दोन सामन्यांच्या सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलीये. या विजयानंतर टीमचा कर्णधार रोहित शर्मा खूश होता. सामन्यानंतर त्याने काय प्रतिक्रिया दिली हे पाहूया.

या सामन्यात ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन यांनी मोलाची भूमिका बजावली. ऋषभ पंतने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्टमध्ये शतक झळकावत या फॉर्मेटमध्ये दमदार कमबॅक केलं. 2022 मध्ये झालेल्या कार अपघातानंतर ऋषभ पंतचा हा पहिलाच टेस्ट सामना होता. दरम्यान ऋषभ पंतचं कमबॅक पाहून रोहित शर्माही भावूक झाल्याचं दिसून आलं.

पंतविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?

सामन्यानंतर पंतविषयी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, पंत खूप कठीण काळातून गेला असून त्याने ज्या पद्धतीने स्वतःला सांभाळलंय ते वाखणण्याजोगं आहे. तो आयपीएलमध्ये परतला, त्यानंतर वर्ल्डकप जिंकला. शिवाय हा त्याचा सर्वात आवडता फॉर्मेट आहे. त्याला हवा असलेला वेळ दिला आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं.

जो निकाल हवा होता तोच मिळाला

बांगलादेशाचा पराभव केल्यानंतर रोहित शर्माला म्हणाला, पुढे काय होणार आहे, हा विचार न करता हा एक चांगला निकाल होता. आम्ही खूप दिवसांनी या फॉर्मेटमध्ये खेळलो. पण याचा अर्थ असा नाही तुम्ही क्रिकेटमधून बाहेर होतात. आम्ही एका आठवड्यापूर्वी इथे आलो होतो, आम्हाला जो निकाल हवा होता तोच मिळाला.

अश्विनची चमकदार कामगिरी

चेन्नई हे रविचंद्रन अश्विनचं होमग्राऊंड आहे. या मैदानावर अश्विनने चमकदार कामगिरी केली. या सामन्यात त्याने शतक झळकावत ५ विकेट्सची कमाईही केली. अश्विन हा गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हींमध्ये महत्त्वाची भूमिका साकारतो. तो कधीही खेळाच्या बाहेर नसतो, असंही रोहितने म्हटलं आहे.

Rohit Sharma on Win First Test vs BAN
Ravi Shastri: विराटने अजिबात घाबरू नये...; कोहलीच्या खराब फॉर्मवर रवी शास्त्रींचं वक्तव्य, म्हणाले, गोलंदांजांना तुमच्यावर दबाव...!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com