Ravi Shastri: विराटने अजिबात घाबरू नये...; कोहलीच्या खराब फॉर्मवर रवी शास्त्रींचं वक्तव्य, म्हणाले, गोलंदांजांना तुमच्यावर दबाव...!

Ravi Shastri Statement: गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीची बॅट साजेसा खेळ करत नाहीये. बांगलादेशाविरूद्धच्या टेस्टमध्ये देखील त्याला चांगला खेळ करता नाही. यावर आता रवी शास्त्री यांनी विधान केलं आहे.
Ravi Shastri Statement
Ravi Shastri Statementsaam tv
Published On

चेपॉकच्या मैदानावर सध्या भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यावर टीम इंडियाचं वर्चस्व दिसून येतंय. विराट कोहली आणि रोहित शर्मा दीर्घ काळाने टेस्ट सामना खेळत असून या दोन्ही खेळाडूंकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र या दोघांनाही साजेसा खेळ करता आला नाही. विराटने पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावामध्ये १७ रन्सची खेळी केली. दरम्यान विराटच्या या फ्लॉप शोवर टीमचे माजी कोच रवी शास्त्री यांनी भाष्य केलं आहे.

विराटचा टेस्टमध्ये फ्लॉप शो सुरुच

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीची बॅट साजेसा खेळ करत नाहीये. 20 जुलै 2023 रोजी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचं टेस्ट क्रिकेटमधील शतक झळकावलं होतं. त्यानंतर विराट कोहलीने 121 रन्सची इनिंग खेळली होती. यानंतर विराट कोहलीने 3 टेस्ट सामन्यांच्या 6 डावात 38, 76, 46, 12, 6 आणि 17 रन्स केल्याची नोंद आहे.

Ravi Shastri Statement
IND vs BAN: इथे लावा एक फिल्डर...; ऋषभ पंतने सेट केली बांगलादेशाच्या टीमची फिल्डींग, Video Viral

काय म्हणाले रवी शास्त्री?

विराटच्या खराब खेळीनंतर सोशल मीडिवरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जातेय. दरम्यान विराटच्या परफॉर्मंसवर प्रतिक्रिया दिलीये. रवी शास्त्री यांच्या मतानुसार, स्टार फलंदाज विराट कोहलीने फलंदाजी करताना पायांची टेक्निक वापरण्यास आणि स्पिनर्सविरुद्ध हवेतील शॉट्स खेळण्यास घाबरू नये.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यातील दुसऱ्या डावात स्पिनर गोलंदाज मेहदी हसन मिराझच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने आपली विकेट गमावली. त्यामुळे विराट कोहली स्पिनरविरूद्ध खेळी शकत नाही, असं सोशल मीडियावर पोस्ट केलं जातंय.

विराटने काहीतरी नवीन गोष्ट केली पाहिजे- शास्त्री

सामन्याच्या कॉमेंट्रीदरम्यान शास्त्री म्हणाले, 'गेल्या २-३ वर्षांत विराट कोहलीची विकेट की बऱ्याचदा स्पिनर्स गोलंदाजांना मिळालीये. मात्र त्याने रन्सही चांगले केलेत. तो खेळत असताना तुम्ही त्याच्या पायांची टेक्निक पाहा. यावेळी स्पिनर्सना तुमच्यावर दबाव आणू देण्याऐवजी त्यांच्यावर प्रेशर टाका. यासाठी तुम्ही काहीतरी वेगळं किंवा नवीन करू शकता.

Ravi Shastri Statement
KL Rahul : पंत आऊट नसतानाही फलंदाजीसाठी का उतरत होता केएल राहुल? चूक लक्षात येताच राहुलने केलं असं की...!

बांगलादेशाविरूद्धच्या टेस्ट सामन्यामध्ये विराट कोहलीचा खेळ काही फारसा चांगला दिसून आला नाही. विराट कोहलीने 51 डावांमध्ये 8 अर्धशतकं आणि 2 शतकांसह 32.72 च्या सरासरीने केवळ 1,669 रन्स केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com