IND vs BAN: इथे लावा एक फिल्डर...; ऋषभ पंतने सेट केली बांगलादेशाच्या टीमची फिल्डींग, Video Viral

IND vs BAN 1st Test Chennai: विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने चांगली कामगिरी करत सेंच्युरी झळकावली. दरम्यान या सामन्यात पंतने एक खट्याळपणा केला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Rishabh Pant sets Bangladesh fielding
Rishabh Pant sets Bangladesh fieldingsaam tv
Published On

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सामना खेळवला जातोय. आज या सामन्याचा तिसरा दिवस असून टीम इंडियाने 507 रन्सची आघाडी घेतलीये. दुसऱ्या डावात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने चांगली कामगिरी करत सेंच्युरी झळकावली. दरम्यान फलंदाजी करत असताना पंतने एक खट्याळपणा केला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऋषभ पंतचा मस्करीचा आणि खोडकर स्वभाव आपल्या प्रत्येकाला माहितीये. अशातच पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी देखील असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला. यावेळी टीम इंडियाची फलंदाजी सुरु असताना ऋषभ पंत फिल्डींग लावताना दिसला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महत्त्वाची बाब म्हणजे पंतचं म्हणणं बांगलादेशाच्या कर्णधाराने ऐकलं देखील.

नेमकं काय घडलं?

पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत आणि शुभमन गिलने टीम इंडियाचा डाव सावरला. यावेळी दोन्ही खेळाडूंनी शतकं झळकावली. दरम्यान ऋषभ पंत बांगलादेशाच्या टीमची फिल्डींग सेट करत होता. यावेळी त्याने बांगलादेशाच्या कर्णधाराला कोण-कोणत्या ठिकाणी फिल्डीर लावले पाहिजेत, याबाबत सल्ला दिला.

पंतचा व्हिडीओ व्हायरल

ही घटना ३५ व्या ओव्हरपूर्वी घडली आहे. यामध्ये ऋषभ पंत म्हणतोय की, या बाजूला एक फिल्डर राहू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे बांगलादेशाच्या कर्णधारानेही पंतची बाब मानली आणि तो सांगत असलेल्या साईडला फिल्डर लावला.

Rishabh Pant sets Bangladesh fielding
Shakib Al Hasan: काळी जादू की टेक्निक? फलंदाजी दरम्यान शाकिब अल हसनने असं का केलं? अखेर समोर आलं खरं कारण

पंत आणि शुभमन गिलचं शतक

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाच्या फलंदाजीला सुरुवात झाली होती. या सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू फ्लॉप ठरल्याचं दिसून आलं. मात्र ऋषभ पंत आणि शुभमन गिलने टीम इंडियाचा डाव सावरला आणि ५०० हून अधिक रन्सची आघाडी घेतली असून डाव घोषित केला आहे. अशा परिस्थितीत पहिल्या टेस्ट सामन्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com