Shakib Al Hasan: काळी जादू की टेक्निक? फलंदाजी दरम्यान शाकिब अल हसनने असं का केलं? अखेर समोर आलं खरं कारण

Shakib Al Hasan Biting String: चेपॉकची ही विकेट फलंदाजांसाठी धोकादायक ठरल्याचं दिसून आलं. मात्र यावेळी बांगलादेशाचा फलंदाज शाकिब अल हसनने एक अनोखी युक्ती वापरल्याचं पाहायला मिळालं.
Shakib Al Hasan Biting String
Shakib Al Hasan Biting Stringsaam tv
Published On

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर बांगलादेशाच्या फलंदाजांना १५० रन्स करणंही जमलं नाही. टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी तरत ३७६ रन्स केले होते. यानंतर बांगलादेशाची संपूर्ण टीम १४९ वर ऑलआऊट झाली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि जडेजाच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशाच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तब्बल १७ फलंदाज बाद झाले. चेपॉकची ही विकेट फलंदाजांसाठी फारशी चांगली ठरली नाही. मात्र यावेळी बांगलादेशाचा फलंदाज शाकिब अल हसनने एक अनोखी युक्ती वापरल्याचं पाहायला मिळालं.

सोशल मीडियावर व्हायरल झाला शाबिकचा फोटो

पहिल्या टेस्टमधील शाकिब अल हसनचा हा अनोखी युक्ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांविरूद्ध त्याने ही युक्ती आखल्याचं चाहत्यांचं म्हणणं होतं. मात्र शाकिबची ही युक्ती कामी आली नाही.

सामन्यादरम्यान असं काय केलं शाकिबने?

फलंदाजी करत असताना शाकिब अल हसन एका काळ्या धाग्याचा तोंडात ठेऊन असल्याचं पाहायला मिळालं. साधारणपणे कोणताही फलंदाज फलंदाजी करताना असं कोणतंही कृत्य करू शकत नाही. मात्र, शाकिब अल हसनचे हे विचित्र कृत्य कॅमेरामध्ये कैद झालं आहे. हे पाहताच आता सोशल मीडियावर त्याची चर्चा होतेय.

दरम्यान आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या युक्तीचा शाकिब अल हसनच्या फलंदाजीशी काय संबंध? या प्रश्नाचे उत्तर बांगलादेशचा माजी ओपनर तमिम इक्बालने दिलं आहे. त्याने दिनेश कार्तिकला सांगितलं शाकिब अल हसनच्या युक्तीचा नेमका अर्थ काय आहे.

शाकिबच्या या कृत्याचा नेमका अर्थ काय?

दिनेश कार्तिकच्या म्हणण्यांनुसार, त्याला तमीम इक्बालने सांगितलं की, हा काळा धागा शाकिबला त्याच्या फलंदाजीदरम्यान फायदेशीर ठरतो. हा काळा धागा तोंडात ठेवल्याने शाकिब अल हसनची एकाग्रता चांगली राहते. इतंकच नाही तर या काळ्या धाग्यामुळे तुमचं डोकं लेग साइडकडे झुकत नाही. शाकिब स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी असं करत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान चाहते मात्र यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Shakib Al Hasan Biting String
Ind vs Ban: टीम इंडियाने बांगलादेशाला का नाही दिला फॉलोऑन? 'या' कारणाने रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com