IPL 2025 मधील मागील काही सामन्यांमध्ये अंपायर्स खेळाडूंच्या बॅट्स चेक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बॅट चेकिंग हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या चेकिंगला गेज टेस्ट (Bat gauge test) असे म्हटले जाते. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, अंपायर्स फलंदाजांच्या बॅटची तपासणी करत आहेत. दिल्ली विरुद्ध मुंबईच्या सामन्यामध्येही गेज टेस्टची चर्चा पाहायला मिळाली.
अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली. तेव्हा रोहित शर्मा रायन रिकल्टनसह फलंदाजी करण्यासाठी आला होता. तेव्हा रिझर्व अंपायरने रोहितला थांबवले आणि त्याच्या बॅटचा गेज टेस्ट केली. गेजमध्ये रोहितची बॅट अडकली. त्यामुळे अंपायरने ही बॅट वापरता येणार नाही असे हिटमॅनला सांगितले.
बॅटने खेळण्यास नकार दिल्याने अंपायरवर रोहित शर्मा नाराज झाला. त्याने लगेच ग्लोव्हज काढले. रोहितने स्वत: गेजने बॅटची मेजरमेंट टेस्ट केली. तेव्हा गॅजमधून बॅट बाहेर निघाली. मेजरमेंट घेताना आपल्याकडून चूक झाली हे कळताच रिझर्व्ह अंपायरने गेज घेऊन लगेच धूम ठोकली. त्यानंतर रोहित शर्मा मैदानात पोहोचला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना मुंबई इंडियन्सने जिंकला. लागोपाठ ३ रनआउट करुन मुंबईने दिल्लीवर त्यांच्या घरच्या स्टेडियमवर मात केली. या सामन्यात रोहित शर्मा १८ धावांवर बाद झाला. दिल्लीच्या विपराज निगमने रोहितला एलबीडब्लू आउट केले. आयपीएल २०२५ मध्ये रोहित शर्माचा खराब फॉर्म सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.