Rohit sharma and yashasvi jaiswal chat video after rr vs mi match video viral amd2000 twitter
Sports

Yashasvi Jaiswal Century: शतक झळकावल्यानंतर यशस्वी अन् रोहितमध्ये काय चर्चा झाली? ऐका मजेशीर संवाद -Video

Yashasvi Jaiswal -Rohit Sharma Viral Video: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३८ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३८ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८० धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी जयस्वालने नाबाद १०४ धावांची खेळी केली. या शानदार खेळीनंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय,ज्यात तो रोहित शर्मासोबत चर्चा करताना दिसून येत आहे.

नेमकी काय चर्चा झाली...

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला विजयासाठी १८० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना यशस्वीने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. त्याने ६० चेंडूंचा सामना करत नाबाद १०४ धावा केल्या.

या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि ७ षटकार मारले. या शानदार खेळीनंतर रोहित शर्मानेही त्याचं कौतुक केलं. दरम्यान सामना झाल्यानंतर दोघांमध्ये चर्चा देखील झाली. त्यावेळी रोहितने त्याला काहीतरी विचारलं. त्यावेळी तो म्हणाला की, 'सामना जिंकणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. बस बाकी काही नाही.' या व्हिडिओवर नेटकरी देखील आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

शतक पूर्ण केल्यानंतर यशस्वीने रोहित शर्माला देखील मिठी मारली. दोन्ही खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळत होते. मात्र आपलाच ज्यूनिअर खेळाडू चांगली कामगिरी करतोय हे पाहून रोहितला देखील आनंद झाला. त्याने मिठी मारत यशस्वीचं कौतुक केलं.

राजस्थानचं प्लेऑफचं तिकीट जवळजवळ कन्फर्म..

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने समाप्त झाले आहेत. सध्या राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. या संघाने ८ पैकी ७ सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाला ८ पैकी केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT