जेवल्यानंतर ढेकर का येतात?

Manasvi Choudhary

ढेकर येणे

जेवल्यानंतर ढेकर येणे ही आपल्या पचनसंस्थेशी निगडित अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे.

Burping | pinterest

ढेकर येण्याची समस्या

जेवण झाल्यावर १-२ वेळा ढेकर येणे सामान्य मानले जाते, परंतु जर तुम्हाला प्रत्येक वेळी जेवल्यानंतर वारंवार ढेकर येत असतील तर याची कारणे जाणून घ्या.

Burping | pinterest

जेवल्यानंतर ढेकर का येतात

जेवल्यानंतर ढेकर का येतात यामागची प्रमुख कारणे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Burping | pinterest

जेवताना पोटात हवा जाणे

जेव्हा तुम्ही घाईघाईत अन्न खाता किंवा जेवताना बोलत असता, तेव्हा अन्नासोबत मोठ्या प्रमाणावर बाहेरील हवा अन्ननलिकेतून पोटात जाते. आणि पोटात साचलेली ही अतिरिक्त हवा जेव्हा बाहेर फेकली जाते तेव्हा ढेकर येतो.

Aerophagia | pinterest

अन्न घाईगडबडीत खाणे

अनेक लोकांना घाईघाईत अन्न न चावता गिळण्याची सवय असते. यामुळे पचनसंस्थेला अन्न पचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. मोठ्या तुकड्यांमुळे पोटातील वायूचा ताण वाढतो आणि ढेकर येतात.

Eating Fast | pinterest

ॲसिडिटी आणि अपचन

जर अन्नाचे योग्य पचन झाले नाही, तर पोटात गॅस तयार होतो. तसेच जठरातील आम्ल वरच्या दिशेने अन्ननलिकेकडे येते, ज्यामुळे छातीत जळजळ होते आणि वारंवार ढेकर येतात.

Acid reflux | pinterest

कार्बोनेटेड पेये आणि च्युइंग गम

जेवणासोबत किंवा जेवल्यानंतर लगेच कोल्ड ड्रिंक्स, सोडा किंवा कार्बोनेटेड पेये पिल्याने पोटात कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो, ज्यामुळे मोठा ढेकर येतो.

Cold drinks | pinterest

बद्धकोष्ठता

पोट साफ नसेल किंवा आतड्यांची हालचाल मंदावली असेल तर पोटातील वायू वरच्या दिशेने दाब निर्माण करतो, ज्यामुळे सतत ढेकर येत राहतात.

Stomach Pain | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: वॉशिंग मशीनमध्ये कपडे उलटे धुवावेत की सरळ? कपडे धुण्याची योग्य पद्धत कोणती?

Washing Machine Clothes | saam tv
येथे क्लिक करा...