Manasvi Choudhary
हिंदू धर्मात, दिवाळी हा सण अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. दिवाळीत ८ नोव्हेंबर २०२६ रोजी लक्ष्मीपूजन साजरा केला जाईल.
लक्ष्मीपूजनाला धन आणि समृद्धीसाठी माता लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीत माता लक्ष्मी भक्ताच्या घरी प्रवेश करते सुख - समृद्धीचा आशीर्वाद देते.
लक्ष्मीपूजन करण्यापूर्वी घर स्वच्छ पुसून घ्या आणि संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडा. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढा.
देवघरात लाल वस्त्र अर्पण करा. त्यावर माता लक्ष्मी, गणपती आणि कुबेर देव यांच्या मूर्ती स्थापन करा. गणपती मूर्ती उजव्या बाजूला स्थापित करा.
फुलांनी सजवून घ्या. नंतर पूजेसाठी कलश स्थापन करा. दिवा आग्नेय कोपऱ्याकडे ठेवा.
पूजेमध्ये विड्याचे पान, सुपारी, लवंग, वेलची आणि कमळाचे बी ठेवा. पाच फळे, फुले ठेवा. पूजा करण्यासाठी पाणी, हळद, तादूंळ, गूळ ठेवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.