

भारतीय हवामान विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ८ नोव्हेंबर रोजी ५ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचा, तसेच पुद्दुचेरी आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. केरळ आणि लक्षद्वीपमधील अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो. यासह तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलच्या काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
केरळ आणि माहेमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, लक्षद्वीप आणि किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो; यावेळी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, ज्यांचा वेग ५० किमी प्रतितासपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या दक्षिण अंतर्गत भागातही पावसाची शक्यता आहे, तर उत्तराखंडमधील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.