आयपीएल २०२४ स्पर्धेत रियान परागचं वेगळंच रुप पाहायला मिळालं आहे. या युवा फलंदाजाला गेल्या काही वर्षांपासून सातत्याने संधी दिली जात होती. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता येत नव्हती. अखेर आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने दमदार कमबॅक करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने या स्पर्धेत फलंदाजी करताना १६१.४२ च्या शानदार स्ट्राईक रेटने ३१८ धावा केल्या आहेत. सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या स्थानी आहे. दरम्यान त्याने आपल्या कमबॅकबाबत मोठा खुलासा केला आहे.
जियो सिनेमावर बोलताना रियान पराग म्हणाला की, ' मी आयपीएल स्पर्धेत कठीण काळातून जात होतो. तेव्हा मी विराट भाईसोबत चर्चा करायचो की, अशा परिस्थितीतून कशाप्रकारे बाहेर निघता येईल. त्यांनी वेळात वेळ काढून १० ते १५ मिनिटं चर्चा केली आणि मला काही गोष्टी सांगितल्या. या गोष्टी मला खूप कामी आल्या. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे.'
ऑरेंज कॅपसाठी विराट- रियानमध्ये लढत...
आयपीएल २०२४ स्पर्धेत आतापर्यंत विराटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने स्पर्धेतील ८ डावात ६३.१७ च्या सरासरीने आणि १५०.३९ च्या स्ट्राईक रेटने ३७९ धावा केल्या आहेत. सध्या ऑरेंज कॅप विराटकडे आहे. तर सनराजझर्स हैदराबाद संघातील फलंदाज ट्रेविस हेड या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
हेडने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये ३२४ धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या रियान परागने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३१८ धावा केल्या आहेत. जेव्हा जेव्हा संघाला त्याची गरज होती. त्यावेळी त्याने फलंदाजीला येत महत्वाची खेळी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.