Virat Kohli Fined: अंपायरवर डोळे वटारणे विराट कोहलीला भोवले; BCCI ची मोठी कारवाई

Virat Kohli Fined By BCCI: कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील फलंदाज विराटने रागात थेट अंपायरशी वाद घातला
Virat Kohli Fined: अंपायरवर डोळे वटारणे विराट कोहलीला भोवले; BCCI ची मोठी कारवाई
virat kohli fined 50 percent of his match fee for breaking ipl code of conduct during kkr vs rcb match amd2000 twitter
Published On

कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील फलंदाज विराटने रागात थेट अंपायरशी वाद घातला. हा राग त्याला आता भलताच महागात पडला आहे. बीसीसीआयने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. (Virat kohli fined by bcci)

बीसीसीआयच्या आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने विराट कोहलीवर मॅच फीच्या ५० टक्के इतका दंड आकारण्यात आला आहे. विराटने या डावात फलंदाजी करताना ७ चेंडूत १८ धावांची खेळी केली. त्याने आपल्या फलंदाजीत पिकअप घेतलाच होता. इतक्यात हर्षित राणाने नो बॉल टाकला आणि विराटच्या खेळीली पूर्णविराम दिला.

Virat Kohli Fined: अंपायरवर डोळे वटारणे विराट कोहलीला भोवले; BCCI ची मोठी कारवाई
KKR vs RCB, IPL 2024: पराभवासोबतच फाफ डू प्लेसिसला आणखी एक मोठा धक्का! BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

दरम्यान विराट जेव्हा बाद होऊन मैदानाबाहेर जात होता त्यावेळी तो अंपायरकडे डोळे वटारुन पाहताना दिसून आला. त्याने अंपायरच्या निर्णयावर प्रश्न देखील उपस्थित केला. शेवटी मैदानाबाहेर गेल्यानंतर त्याने रागात डस्टबिन देखील उडवला. हे सर्व पाहता बीसीसीआयने ही कारवाई केली. त्यामुळेच बीसीसीआयने ही कारवाई करण्यात आली आहे.

Virat Kohli Fined: अंपायरवर डोळे वटारणे विराट कोहलीला भोवले; BCCI ची मोठी कारवाई
KKR vs RCB Last Over: 20 व्या षटकातील थरार! IPL च्या सर्वात महागड्या खेळाडूला फिरकी गोलंदाजाने ठोकले ३ षटकार -Video

नेमकं काय घडलं?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ या सामन्यात २२३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरला होता. या धावांचा पाठलाग करताना विराटने संघाला शानदार सुरुवात करुन दिली. तो १८ धावांवर फलंदाजी करत असताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून तिसरे षटक टाकण्यासाठी हर्षित राणा गोलंदाजीला आला. या षटकातील पहिलाच चेंडू त्याने फुट टॉस टाकला. चो विराटला कळालाच नाही. हा चेंडू विराटच्या बॅटला लागून हवेत गेला आणि हर्षित राणाने सोपा झेल टिपला. अंपायरनेही त्याला बाद घोषित केलं. विराटने DRS ची मागणी केली. दरम्यान DRS मध्येही तो बाद असल्याचं दिसून आलं. विराटला वाटत होतं की, तो नाबाद आहे. त्यामुळे तो अंपायरवर संताप व्यक्त करताना दिसून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com