Rishabh Pant captain Guwahati Test saam tv
Sports

IND vs SA: गुवाहाटी टेस्टसाठी ऋषभ पंत कर्णधार; गिलची जागा कोण घेणार? पाहा संभाव्य प्लेईंग ११

Rishabh Pant captain Guwahati Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची कसोटी गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर खेळली जाणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या दुसरा टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान गुवाहाटीला खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यातून टीमचा कर्णधार शुभमन गिल बाहेर पडला आहे. बीसीसीआयने शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. कोलकात्याच्या टेस्टमध्ये शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो रिटायर्ड हर्ट झाला होता.

कोलाकाता टेस्टमध्ये गिलला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की, गिलला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. यावेळी दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. गिल दुसऱ्या टेस्टसाठी टीमसोबत गुवाहाटीला पोहोचला होता. पण दुसरी टेस्ट खेळण्यासाठी को फीट नसल्यामुळे त्याला टीममधू बाहेर करण्यात आलं होतं. आता गुवाहाटी टेस्टमध्ये ऋषभ पंत भारतीय टीमचं नेतृत्व करणार आहे.

बीसीसीआयच्या निवेदनात काय म्हटलंय?

बीसीसीआयने 21 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय की, “टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात मानेला दुखापत झाली होती, तो गुवाहाटीतील दुसऱ्या टेस्टमधून बाहेर पडला आहे.”

कोलकाता टेस्टच्या दुसऱ्या दिवशी गिलला मानेला दुखापत झाली होती. दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. 19 नोव्हेंबर 2025 रोजी तो गुवाहाटीला रवानाही झाला होता.

मात्र गुवाहाटी म्हणजेच दुसऱ्या टेस्टसाठी तो पूर्णपणे फिट नव्हता आणि आता पुढील तपासणीसाठी त्याला मुंबईला पाठवण्यात येणार आहे. गिलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत दुसऱ्या टेस्टमध्ये टीमचं नेतृत्व करणार आहे.

गुवाहाटी टेस्ट भारतासाठी महत्त्वाची

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी टेस्ट 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीमध्ये खेळली जाणार आहे. गिलच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाची मिडल ऑर्डर कमजोर होणार आहे. त्यांच्या जागी शुभमन गिलला संधी मिळू शकणार आहे. तर ध्रुव जुरेल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची करू शकतो.

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली कशी असेल टीम इंडिया

यशस्वी जैयस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत (कर्णधार), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Facts: स्वप्नात ओरडलो तरी आवाज निघत नाही? असं का होतं?

राज ठाकरेंचा मुंबईत नवा डाव; गुजराती आणि मुस्लिम उमेदवार मैदानात|VIDEO

Vande Bharat Train: देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 'या' मार्गावर धावणार; जाणून घ्या तिकीट दर अन् A1 सुविधा?

Bullet Train launch date : भारतात पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; तारीख केली जाहीर, ५ टप्पेही सांगितले

निवडणुकीच्या आखाड्यात बाप-लेक एकमेकांच्या विरोधात; शिंदेसेना-ठाकरेसेनेत काँटे की टक्कर|VIDEO

SCROLL FOR NEXT