Rishabh pant statement after defeat against kolkata knight riders amd2000 twitter
Sports

Rishabh Pant Statement: दिल्लीच्या पराभवानंतर रिषभ पंत भडकला! सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Rishabh Pant Statement On Defeat, KKR vs DC: आयपीएल २०२४ स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटकअखेर ९ गडी बाद अवघ्या १५३ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने १६.३ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. दरम्यान या पराभवानंतर काय म्हणाला दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत? जाणून घ्या.

या सामन्यानंतर बोलताना कर्णधार रिषभ पंत म्हणाला की, ' प्रथम फलंदाजी करणं हा एक योग्य पर्याय होता. मात्र आम्हाला चांगली कामगिरी करता आली नाही. ज्याप्रकारचे सामने पाहायला मिळत आहेत, ते पाहता १५० धावा या सरासरीपेक्षाही कमी होत्या. मात्र आम्ही चुकांमधून शिकतोय. कारण प्रत्येक दिवस हा आपला नसतो. एक संघ आम्ही म्हणून आम्ही चांगली कामगिरी करतोय. माझ्या मते आम्ही १८०-२१० धावा करायला हव्या होत्या. आम्ही गोलंदाजांसाठी हव्या तितक्या धावा शिल्लक ठेवल्या नाही.'

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला धावफलकावर २० षटकअखेर ९ गडी बाद १५३ धावा लावल्या. या संघाकडून फलंदाजी करताना कुलदीप यादवने २६ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ३५ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला.

मुख्य बाब म्हणजे कुलदीप यादव हा दिल्ली कॅपिटल्स संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून फिल सॉल्टने ३३ चेंडूंचा सामना करत ६८ धावांची वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिली. दरम्यान हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ गडी राखून जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT