IND vs SA VIDEO saam tv
Sports

IND vs SA VIDEO: लेगमध्ये त्याचा कॅच मिळतो...! टेम्बा बवुमासाठी पंतने आपल्या स्टाईलने लावली फिल्डींग; पुढच्याच बॉलला गेली विकेट

Rishabh Pant smart catch Temba Bavuma out: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट सामन्यात एक अत्यंत महत्त्वाचा आणि चतुर क्षण पाहायला मिळाला. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा पॅव्हेलियनमध्ये परतला.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील पहिला सामना ईडन गार्डन्सवर खेळवला जातोय. या सामन्यात बऱ्याच महिन्यांनी ऋषभ पंतचं कमबॅक झालंय. दुखापतीमुळे तो काही दिवस मैदानाबाहेर होता. कमबॅक केल्याच्या या सामन्यात कर्णधार टेम्बा बवुमाच्या विकेटमुळे पंत चांगलाच चर्चेत आहे.

टेम्बा बवुमासाठी पंतने लढवली शक्कल

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत फिल्डींग सेट करत होता. यावेळी त्याने लेग साईडला असलेल्या सर्व खेळाडूंना सतर्क राहण्यास सांगितलं. पंतचं सर्व म्हणणं स्टम्प माईकमध्ये कैदही झालंय.

बॉल टाकण्यापूर्वी पंतने कुलदीप आणि फिल्डींगला उभ्या असलेल्या जुरेलला सांगितलं की, बवुमा स्विप शॉट खेळतो त्यामुळे लेगमध्ये त्याचा कॅच मिळू शकतो. त्यानंतर अवघ्या काही वेळातच कुलदीपच्या एका बॉलवर बवुमा स्विप शॉटवर कॅच देऊन बसला. कुलदीपचा बॉल त्याच्या बॅटच्या आतील बाजूस लागला आणि लेग स्लिपवर उभ्या असलेल्या ध्रुव जुरेलने तो योग्य पद्धतीने टिपला. यानंतर सर्वजण पंतकडे पाहू लागले. टेम्बाच्या विकेटसाठी पंतने लढवलेली शक्कल कामी आली.

दोन विकेट बुमराहच्या खात्यात

टीम इंडियासाठी विकेट घेण्याची सुरुवात जसप्रीत बुमराहने केली. बुमराहने रायन रिकल्टनची पहिली विकेट घेतली. आणि त्यानंतर एडेन मार्करमला देखील स्वस्तात माघारी धाडलं. रिकेल्टन 23 रन्स तर मार्करम 31 रन्स करत पव्हेलियनमध्ये पोहोचले. बुमराहने ११ व्या ओव्हरमध्ये रिकेल्टनला बोल्ड केलं तर १३ व्या ओव्हरमध्ये मारक्रमला पंतच्या हातून कॅच आऊट केलं.

टीम इंडियाने पुन्हा गमावला टॉस

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा वबुमाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेकडून कगिसो रबाडा या सामन्यासाठी उपलब्ध नाहीये. तर त्याच्या जागी कॉर्बिन बॉशला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तर टीम इंडियामध्ये ऋषभ पंतचं कमबॅक झालंय. शिवाय अक्षर पटेलही टीममध्ये परतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Puri Tips: पुरी फुगतच नाही? खूप तेल पितात? पिठात घाला 'हा' पदार्थ, परफेक्ट पुऱ्यांचं सिक्रेट

Bihar Election Result : बिहारचा मुख्यमंत्री ठरला! नितीश कुमारच होणार CM, एनडीएच्या बड्या नेत्याचं मोठं विधान

Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची?

Bihar Election Result Live Updates : नाचता येईना,अंगण वाकडे; चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका

Bihar Election Rsult: गुंडराज संपवल्यामुळेच हा महाविजय साकार – सुधीर मुनगंटीवारांची बिहार निकालावर प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT