India vs South Africa : भारताच्या स्टार क्रिकेटपटूची हटके कामगिरी; अवघ्या २३ धावा करून २८ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

India vs South Africa women match : भारताच्या स्टार क्रिकेटपटूची हटके कामगिरी केली आहे. भारताच्या स्मृती मंधानाने अवघ्या २३ धावा करून २८ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे.
India vs South Africa women match
smriti mandhanaSaam tv
Published On

टीम इंडियाचा आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ मध्ये तिसरा सामना हा दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात सुरु आहे. या सामन्यात भारतीय चाहत्यांना सलामीवर स्मृती मंधाना चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, स्मृतीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना निराश केलं. स्मृती २३ धावा करून बाद झाली. याआधी श्रीलंका आणि पाकिस्तानविरोधात स्मृतीने अनुक्रमे ९ आणि २३ धावा कुटल्या होत्या.

India vs South Africa women match
Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

स्मृतीने दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात खेळताना एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्मृती वुमेन्स ओडीआयमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. स्मृतीने ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार बेलिंडा क्लार्कचा २८ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे. मंधानाने षटकार लगावून बेलिंडाचा रेकॉर्ड मोडला.

बेलिंडा क्लार्कने १९९७ साली महिला वनडेमध्ये एकूण ९७० धावा कुटल्या होत्या. तर स्मृतीने या वर्षी १७ सामन्यात ९८२ धावा केल्या आहेत. तिने सरासरी ५७.७६ आणि स्ट्राइक रेट ११२.२२ ने धावा केल्या. स्मृतीने वर्ष २०२५ मध्ये वूमेन्स ओडीआयमध्ये ४ शतक आणि ३ अर्धशतक ठोकलं आहे.

सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू नादिन डिक्लार्कने म्हटलं की, स्मृती मंधानाला लवकर बाद करण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण तिची मैदानावरील कामगिरी चांगली आहे. मात्र, नादिनची आजच्या सामन्याची भविष्यवाणी खरी ठरली. दक्षिण आफ्रिकेने भारतीय सलामीवीरांना लवकर माघारी पाठवलं. भारतीय फलंदाजांना म्लाबाची फिरकी महागात पडली. म्लाबाने हरलीन देयोलला देखील तंबूत पाठवलं.

India vs South Africa women match
Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा कुणाच्या? (महिला वनडे क्रिकेट)

982 - स्मृती मंधाना (भारत, २०२५)*

970 - बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया, 1997)

882 - लॉरा वोलवार्ट (दक्षिण आफ्रिका, 2022)

880 - डेबी हॉकले (न्यूझीलंड, 1997)

853 - एमी सॅटर्थवेट (न्यूझीलंड, 2016)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com