Rishabh Pant Ind Vs Eng x
Sports

Rishabh Pant : लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताला मोठा धक्का; रिषभ पंतने मैदान सोडलं, कारण...

Ind Vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना सध्या लॉर्ड्स स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यादरम्यान भारताचा विकेटकीपर आणि उपकर्णधार रिषभ पंतने मैदान सोडले आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng 3rd Test : लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. पहिल्याच दिवशी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मालिकेमध्ये दमदार खेळी करणारा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार रिषभ पंत लॉर्ड्सच्या मैदानावर दुखापतग्रस्त झाला आहे. दुखापतीमुळे पंत मैदान सोडून गेला. त्याच्या जागी ध्रुव जुरेल विकेटकीपिंगसाठी मैदानात उतरला.

टॉस गमावल्यानंतर भारताचा संघ गोलंदाजीसाठी मैदानात उतरला. दुसऱ्या सत्राच्या ३४ व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह गोलंदाजी करण्यासाठी आला. ओव्हरमधील पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता, पंतने डावीकडे डाइव्ह मारुन चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि चेंडू सीमारेषेपार गेला. त्यावेळेस रिषभ पंत वेदनेने ओरडू लागला. डाइव्ह मारल्याने रिषभ पंतच्या डाव्या हाताचे बोट मुरगळले. वेदनेमुळे पंत अस्वस्थ झाला होता.

रिषभ पंतला दुखापत झाल्यानंतर टीम इंडियाचे डॉक्टर मैदानात पोहोचले. मॅजिक स्प्रे लावून वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला. रिषभ पंतने पुन्हा विकेटकीपिंग सुरु केले पण हातमोजे घालूनही पंत वेदनांमध्ये दिसत होता. रिषभ पंतने ओव्हरसंपेपर्यंत विकेटकीपिंग केली. ओव्हर संपताच तो पॅव्हेलियनमध्ये गेला. रिषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेलला विकेटकीपर म्हणून खेळवण्यात आले.

रिषभ पंतला टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये नेण्यात आले. लॉर्ड्सच्या बाल्कनीतून खेळ पाहणारा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर उठला आणि रिषभ पंतची विचारपूस करण्यासाठी गेला. पंतची दुखापत किती गंभीर आहे, त्याला रुग्णालयामध्ये न्यावे लागणार आहे की नाही याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरले नाहीत, संजय राऊतांचा टोला

Bhagavad Gita: भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात कोणती शिकवण मिळते?

...तर बाळाला फेकून देईन अन् मीही आत्महत्या करेल, PCMC अधिकाऱ्याला महिलेची धमकी|VIDEO

Maharashtra Live News Update : गर्दी झाली नाही म्हणून मंत्री चिडल्या, कानाखाली मारण्याची भाषा – रोहित पवारांचा संताप

Video : सैन्यदलातील अधिकाऱ्याचा राडा! विमानतळावरील कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाचा पाठीचा कणा तुटला, दुसऱ्याचा जबडा फाटला

SCROLL FOR NEXT