rishabh pant google
क्रीडा

Rishabh Pant: मन जिंकलस भावा! कॉलेजच्या गरीब विद्यार्थ्यासाठी रिषभ पंतने मदतीचा हात केला पुढे

Rishabh Pant Helped College Student: एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रिषभ पंतकडे मदतीची मागणी केली होती. त्याने अवघ्या काही मिनिटात मदत केली.

Ankush Dhavre

भारताचा स्टार फलंदाज रिषभ पंत हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. रिषभ काही महिन्यांपूर्वीच क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्या कारता अपघात झाला होता.

या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून दुर राहावं लागलं होतं. दरम्यान रिषभ पंत यावेळी आपल्या मैदानावरील कामगिरीमुळे नव्हे, तर वेगळ्याच कामगिरीमुळे चर्चेत आला आहे.

रिषभ पंत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असतो. अनेकदा तो फॅन्सला रिप्लायही करताना दिसून येत असतो. सोशल मीडियावर एका युजरने त्याला शाळेची फी भरण्यासाठी मदत मागीतली आणि काही मिनिटातच रिषभने त्याला मदत केली.

कार्तिकेय मौर्या असं या युजरचं नाव आहे. कार्तिकेयला आपल्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे हवे होते. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आणि या पोस्टमध्ये रिषभ पंतला टॅग केलं. अवघ्या काही मिनिटात रिषभ पंतने या पोस्टला रिप्लाय केला आणि ९० हजार रुपयांची मदतही केली. त्यानंतर कार्तिकेयने रिषभ पंतचे आभार मानले आहेत.

काय होतं पोस्टमध्ये?

कार्तिकेयने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहीले होते की, ' हॅलो, माझं नाव कार्तिकेय मौर्य आहे आणि मी चंदीगड विश्वविद्यालयातून माझं इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण करतोय. मी शिक्षणाला प्राधान्य दिलं आहे. मी पार्ट टाईम जॉब करुन माझा शिक्षणाचा खर्च करण्याचा प्रयत्न केला. पण काम आणि शिक्षण यांच्यात समतोल साधणं जरा कठीण होतं. मी माझ्या कुटुंबावर कुठलाही भार न टाकता स्वत:ची स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला होता.'

तसेच त्याने पुढे लिहीले की, ' मात्र गेल्या काही महिन्यांपासून मी कायमस्वरुपी रोजगार शोधण्याच्या प्रयत्नात आहे. माझी बचत खूप कमी होतेय. मी पूर्ण प्रयत्न करुनही मला नोकरी मिळत नाहीये. त्यामुळे माझ्यावर कॉलेजची फिस भरण्याचा ताण वाढतच चालला आहे. तुम्ही मदत केली, तर माझं आयुष्य बदलेल, प्लीज माझी मदत करा किंवा माझं कॅम्पेन शेअर करा.'

ही पोस्ट व्हायरल होताच, रिषभ पंतने त्याला मदत करत त्याच्या कॉलेजची फी भरली. यासह कॅप्शनही दिलं. त्याने लिहिलं की, 'नेहमी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा. देवाकडे नेहमीच आपल्यासाठी चांगला प्लान असतो.' पंतची ही पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देखील देताना दिसून येत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT