Rishabh Pant Bowling: ग्लोव्हज काढले, बॉल घेतला; रिषभ पंत बनला शेन वॉर्न -पाहा VIDEO

Rishabh Pant Viral Video: भारतीय संघातील आक्रमक फलंदाज रिषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात तो गोलंदाजी करताना दिसतोय.
Rishabh Pant Bowling: ग्लोव्हज काढले, बॉल घेतला; रिषभ पंत बनला शेन वॉर्न -पाहा VIDEO
rishabh panttwitter
Published On

आक्रमक फलंदाजी आणि एमएस धोनीस्टाईल विकेटकिपिंग करणाऱ्या रिषभ पंतन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. भारतीय संघातील खेळाडू विश्रांतीवर असताना, रिषभ पंत दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत खेळताना दिसतोय.

या स्पर्धेतील उद्धाटनाचा सामना साऊथ दिल्ली आणि ओल्ड दिल्ली ६ यांच्यादरम्यान खेळला गेला. यादरम्यान रिषभ पंतने फलंदाजी सोडून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Rishabh Pant Bowling: ग्लोव्हज काढले, बॉल घेतला; रिषभ पंत बनला शेन वॉर्न -पाहा VIDEO
MTHL Bridge : अटल सागरी सेतूवर बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका, समोर आलेल्या VIDEOने चिंता वाढवली

पंतची गोलंदाजी

फलंदाजी करताना चौकार षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या रिषभ पंतला तुम्ही क्वचितच गोलंदाजी करताना पाहीलं असेल. त्याने भारतीय संघासाठी आणि आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघासाठी अनेक सामने खेळले आहेत.

मात्र यापूर्वी कधीच गोलंदाजी केली नव्हती. दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र त्यावेळी विरोधी संघाला जिंकण्यासाठी केवळ १ धावेची गरज होती. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर सामना समाप्त झाला.

Rishabh Pant Bowling: ग्लोव्हज काढले, बॉल घेतला; रिषभ पंत बनला शेन वॉर्न -पाहा VIDEO
Video : खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला मजुराचा ५ वर्षांचा चिमुकला; अहमदनगरमधील धक्कादायक घटना

दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली. या स्पर्धेचा उद्धाटन सोहळा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. उद्धाटन सोहळ्यासाठी बादशाह आणि सोनम बाजवा हे दोघे आमनेसामने आले होते. दरम्यान विराट कोहली, इशांत शर्मा, शिखर धवन आणि रिषभ पंतचा सन्मान केला.

रिषभ पंत फलंदाजीत फ्लॉप

या सामन्यात गोलंदाजीमुळे चर्चेत आलेला रिषभ पंत फलंदाजीत हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. त्याला ३२ चेंडूत ३५ धावा करता आल्या. यादरम्यान त्याला ४ चौकार आणि १ षटकार मारला.

या खेळीच्या बळावर त्याने आपल्या संघाची धावसंख्या १९७ धावांवर पोहोचवली. रिषभ पंतच्या संघाकडून अर्पित राणाने ५९ धावांची खेळी केली. तर कर्णधार आयुष बदोनीने २९ चेंडूंचा सामना करत ५७ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com