MTHL Bridge : अटल सागरी सेतूवर बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका, समोर आलेल्या VIDEOने चिंता वाढवली

Atal Setu : अनेक चालक या सेतूवर वाहने थांबून फोटो किंवा सेल्फी घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा गोष्टी टाळण्याचे आवाहन MMRDAने केले आहे.
Atal Setu
Atal Setu Saam TV
Published On

Mumbai News :

देशातील सर्वात मोठा सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज नागरिकांसाठी खुला झाला आहे. अटल सेतू सुरू झाल्यानंतर या सेतूवरून प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होतं आहे. मात्र अनेक चालक या शिवडी-न्हावाशिवा सेतूवर वाहने थांबून फोटो किंवा सेल्फी घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा गोष्टी टाळण्याचे आवाहन MMRDAने केले आहे.

अटल सेतूवर अनेक वाहने अशा पद्धतीन थांबत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघाताचा धोका टाळण्यासाठी या सेतूवरही वाहने प्रवासादरम्यान थांबल्यास वाहतूक विभागाला कारवाईच्या सूचना दिल्या जाऊ शकतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Atal Setu
Maharashtra Politics: 'न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतयं? 'शिवडी न्हावा शेवा' प्रकल्पावरुन ठाकरे गटाचा भाजपला सवाल

१२ जानेवारी रोजी अटल सेतूचं लोकार्पण झाल्यानंतर या पुलावरुन प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी लोकांची येथे गर्दी होत आहे. एखाद्या पर्यटन स्थळाप्रमाणे लोक पुलावर वाहने पार्क करत आहे. अनेक जण सेतूवर वाहने पार्क करुन फोटो छायाचित्र, सेल्फी काढत होते. या सेतूवर ताशी १०० किमी वेगमर्यादा असताना असे मधेच थांबून फोटो काढणे अत्यंत धोकादायक आहे.

Atal Setu
Shivdi Nhava Sheva Toll: २५० ते १५८० रुपये; 'अटल' सेतूवरुन प्रवास करण्यासाठी कोणत्या वाहनाला किती टोल भरावा लागेल?

अटल सेतूवरून पहिल्याच दिवशी ८१६४ वाहनांनी प्रवास केला आहे. या सागरी सेतूवरून एकेरी प्रवास करण्यासाठी २५० रुपये टोल मोजावा लागणार आहे. तर दुहेरी प्रवासासाठी ३७५ रुपये टोल भरावा लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com