Rishabh Pant: नीरज चोप्रा गोल्ड जिंकताच भाग्यवान विजेत्याला रिषभ देणार लाखांचं बक्षीस; काय आहे ऑफर?

Rishabh Pant On Neeraj Chopra: भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने नीरज चोप्राच्या फायनलपूर्वी हटके ऑफर दिली आहे.
Rishabh Pant: नीरज चोप्रा गोल्ड जिंकताच भाग्यवान विजेत्याला रिषभ देणार लाखांचं बक्षीस; काय आहे ऑफर?
neeraj chopratwitter
Published On

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने मंगळवारी एकच वार आणि सारे गार, असा थ्रो केला. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील पात्रता फेरीत त्याने ८९.३४ मीटर लांब भाला फेकला आणि फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. त्यामुळे त्याच्यावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव केला जातोय. भारताचं एक पदक जवळजवळ निश्चित झालंय असं म्हटलं जातं आहे. दरम्यान नीरज चोप्राने गोल्ड आणल्यास भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने एक हटके ऑफर दिली आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

नीरज चोप्राचा फायनलमध्ये प्रवेश

भालाफेक प्रकारातील पात्रता फेरीत भारताकडून किशोर जेना आणि नीरज चोप्रा मैदानात उतरले होते. नीरज चोप्राने पात्रता फेरीत ८९.३४ मीटर लांब भाला फेकून फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. तर दुसरीकडे किशोर जेनाला ठराविक अंतराइतका भाला फेकता आला नाही. त्यामुळे तो अपात्र ठरला. नीरज चोप्रासह पाकिस्तानचा अरशद नदीमही फायनलसाठी पात्र ठरला आहे. त्याने पात्रता फेरीत ८६.५९ मीटर लांब भाला फेकला.

Rishabh Pant: नीरज चोप्रा गोल्ड जिंकताच भाग्यवान विजेत्याला रिषभ देणार लाखांचं बक्षीस; काय आहे ऑफर?
IND vs SL : श्रीलंकेत भारताची नाचक्की, २७ वर्षानंतर पहिल्यांदाच दारुण पराभव

रिषभ पंतची हटके ऑफर

भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतही नीरज चोप्राला सपोर्ट करतोय. त्याने लाखो रुपयांच्या बक्षिसाचीही घोषणा केली आहे. रिषभ पंतने आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

रिषभ पंतने पोस्ट शेअर करत लिहिले की, ' जर नीरज चोप्राने उद्या सुवर्णपदक जिंकलं तर मी सर्वाधिक लाइक्स करणाऱ्या आणि कमेंट करणाऱ्या एका लकी विजेत्याला १०००८९ रुपये देईल. इतर १० लोकांना प्लेनचं तिकीट देईल.चला तर आपल्या भावाला समर्थन करूया.'

Rishabh Pant: नीरज चोप्रा गोल्ड जिंकताच भाग्यवान विजेत्याला रिषभ देणार लाखांचं बक्षीस; काय आहे ऑफर?
Paris Olympics 2024: नीरज चोप्राचं सुवर्णपदकावर लक्ष; भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या, काय आहे पॅरिस ऑलिम्पिकचं आजचं वेळापत्रक?

कधी होणार फायनल?

नीरज चोप्राने भालाफेक प्रकारातील फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याचा फायनलचा सामना ८ ऑगस्ट रोजी रात्री ११:५० ला सुरू होईल. नीरजला पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com