बॉर्डर- गावसकर मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. २२ नोव्हेंबरपासून या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत.
दरम्यान बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात जसप्रीत बुमराह फलंदाजी तर रिषभ पंत गोलंदाजी करताना दिसून येत आहे. या दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बीसीसीआयने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असलेल्या जसप्रीत बुमराहला गोलंदाजी करताना दिसून आला आहे. गोलंदाजीला येण्यापूर्वी तो बुमराहला म्हणाला की, मी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक गडी बाद केलाय....त्यानंतर बुमराहनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. ज्यावेळी या दोघांमध्ये जुगलबंदी सुरु होती,त्यावेळी भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलही तिथेच होता.
पंतने टाकलेला पहिला चेंडू बुमराहने खेळून काढला. त्यानंतर पुढचा चेंडूही बुमराहने खेळून काढला. तिसऱ्या चेंडूवर बुमराहने पुल शॉट मारला. त्यावेळी रिषभ म्हणाला की, हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल.
तर बुमराह त्याला प्रत्युत्तर देत म्हणाला की, हा चेंडू एकतर सीमापार गेला असता, नाहीतर कमीत कमी २ धावा मिळाल्या असत्या. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे .त्यामुळे त्याच्याऐवजी कर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवली जाऊ शकते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बुमराहची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.